आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Survey Says Youth In India Is Not Capable For Job

नोकरीसाठी परिपूर्ण नाहीत पदवीधर, ४०० कंपन्यांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव - मजबूत होत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारतात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. मात्र, ९७ टक्के कंपन्या नव्या पदवीधारकांना संधी देण्यास तयार नाहीत. विद्यापीठे सध्या फक्त पदवीधर तयार करत आहेत, कुशल मनुष्यबळ नव्हे, असे बहुतांश कंपन्यांना वाटते.
नोकरभरती क्षेत्राशी संबंधित ‘करिअर बिल्डर इंडिया’च्या ताज्या सर्वेक्षणात ही वस्तुस्थिती समोर आली आहे. हे सर्वेक्षण ४०० पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये करण्यात आले.
या वर्षी मिळेल चांगला स्टार्ट
सर्वेक्षणानुसार ६५ टक्के कंपन्या या वर्षी जास्त स्टार्टिंग सॅलरी देतील. १२ टक्के कंपन्यांची गेल्या वर्षीपेक्षा कमी वेतन देण्याची योजना आहे. ९४ टक्के कंपन्या कुशल उमेदवारांसाठी वेतनासाठी निगोशिएशन करण्यासही तयार आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, सर्वेक्षणातील काही तथ्ये...