आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलजी पाकमध्‍ये गेले तेव्‍हा कारगिल, मोदी गेले तर पठाणकोट- शिंदेंचे टिकास्‍त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पठाणकोट एअरबेसवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्यानंतर माजी केंद्रीय गृह मंत्री व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी सरकारवन नेम साधला आहे. ते म्‍हणाले की, 'देशाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारकडे कोणतीही योजना नाही, भाजप सरकार अपयशी ठरले असून, लोकांची दिशाभूल केली जात आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
तेव्‍हा कारगिल, आता पठाणकोट
सुशीलकुमार शिंदे असेही म्‍हणाले की, 'वाजपेयी पाकिस्‍तानात गेले होते तेव्‍हा कारगिल युद्ध झाले होते. आता मोदी लाहोरला जाऊन आले. त्‍यानंतर पठाणकोट हल्‍ला झाला.'
आमचा चर्चेला विरोध नाही
शिंदे म्‍हणाले - आम्‍ही कधी भारत-पाक चर्चेला विरोध केला नाही. या दोन देशांमध्‍ये चर्चा व्‍हायलाच हवी. मात्र न सांगता पाकिस्‍तानमध्‍ये जाणे धोकादायक ठरू शकते. जुन्‍या हल्‍ल्यांचा उल्‍लेख करून शिंदे म्‍हणाले, मोदी सरकारने दहशदवादाविरोधात कठोर पावले उचलावी.
काय म्‍हणाले सुशीलकुमार ...
- कंदहारमध्ये भाजपच्या मंत्र्यांनेच दहशतवादी सोडले होते.
- पठाणकोट दहशतवादी हल्ला झाल्याने सरकारने देशाची माफी मागावी.
- मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले होते हे आपल्‍याला माहित आहे.
- भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे.
- दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो, पंतप्रधान मोदींकडून खूप अपेक्षा होत्या.