आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde Denies Permission To Land Narendra Modi In Utterakhand

मोदींच्‍या दौ-याला शिंदेंनी लावला ब्रेक, हेलिकॉप्‍टर उतरविण्‍यास परवानगी नाकारली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/डेहराडून- महापूर आणि ढगफुटीमुळे आलेल्‍या प्रलयात उद्ध्‍वस्‍त झालेल्‍या उत्तराखंडमये वायुसेनेकडून एक मोठे बचाव अभियान राबविण्‍यात येत आहे. खराब वातावरणतही वायुसेनेच्‍या तीन हेलिकॉप्‍टर्सनी उड्डाण केले. उत्तराखंडमध्‍ये पुन्‍हा पावसाची शक्‍यता असून मदत कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. तरीही हजारो लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्‍यासाठी वायुसेनेने ही मोहीम थांबविली नाही. दुसरीकडे उत्तराखंडच्‍या प्रलयावरुन मोठे राजकारण होत आहे. गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी आज पूरग्रस्‍त भागाचा दौरा करणार होते. परंतु, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोदींच्‍या हेलिकॉप्‍टरला पूरग्रस्‍त भागात उतरविण्‍यास परवानगी दिली नाही. कोणताही मुख्‍यमंत्री किंवा केंद्रीय मंत्र्याला पूरग्रस्‍त भागात हेलिकॉप्‍टरने उतरण्‍याची परवानगी देण्‍यात येणार नाही. मदत कार्यात यामुळे अडथळा निर्माण होतो. मोदीही यास अपवाद नाहीत, असे शिंदे यांनी स्‍पष्‍ट केले.

उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी बेताल वक्तव्‍य केले आहे. प्रभावित भागातून 24 तासांमध्‍येच सर्वांना काढू शकतो, असा दावा त्‍यांनी केला.

दरम्‍यान, उत्तराखंडमध्‍ये 3 दिवसांचा राजकीय शोक जाहीर करण्‍यात आला आहे. नविन हेलिपॅड बनविल्‍यानंतर मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्‍टर उत्तराखंडमध्‍ये पाठविण्‍यात आले होते. तरीही सर्वांना अद्याप बाहेर काढण्‍यात अपयश आले आहे. त्‍यामुळे सर्वत्र जनतेचा रोष उफाळून येत आहे.