आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनसोबतच्या सीमावादावर सर्व देशांचा भारताला पाठिंबा, सुरक्षेच्या पातळीवर भारत सतर्क- सुषमा स्वराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ट्राय जंक्शनच्या परिस्थितीत चीनला एकतर्फी बदल करण्याची इच्छा आहे. भारताच्या सुरक्षेसाठी हे आव्हान आहे. परंतु सीमावादावर सर्व देशांचा भारताला पाठिंबा आहे. भारत सुरक्षेच्या पातळीवर सतर्क आहे, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. गुरुवारी त्या राज्यसभेत बोलत होत्या.  

सीमावादावर उभय देशांत पंचशील तत्त्वांचे आजही पालन केले जाते. परंतु चीन भारताशी लागून असलेल्या देशांसोबत बंदर, माल वाहून नेण्याची व्यवस्था विकसित करण्याचे काम करू लागला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानसोबत आर्थिक प्रकल्प हाती घेतला आहे. वन बेल्ट वन रोडही तयार केला जात आहे. चीनच्या या हालचालींवर भारताचे बारकाईने लक्ष आहे. मात्र, भारताला कोणीही घेऊ शकत नाही. भारत-चीन सीमेवर एक जागा आहे. त्याला ट्राय जंक्शन पॉइंट म्हटले जाते. त्यावरून भारत-चीन यांच्यात लेखी सहमती आहे. त्याच्या १३ व्या परिच्छेदात याच्याशी संबंधित निर्णय भारत-चीन व भूतान मिळून करतील, असे नमूद करण्यात आली आहे.

चीनच्या हस्तक्षेपावर भारताने विरोध केला नसल्याच्या आरोपाला सुषमा स्वराज यांनी फेटाळले. स्वराज म्हणाल्या, आम्ही त्याच वेळी चीनला विरोध करताना मित्रराष्ट्रांना कळवलेदेखील होते. अद्याप भारत-चीन सीमा निश्चित व्हायची आहे. चीन-भूतानची सीमादेखील निश्चित व्हायची आहे. भारत-चीन वादाचे मूळ कारण डोकलामपर्यंत आलेले चिनी सैन्य ठरले आहे. कारण ही चीन-भारत-भूतानची संयुक्त सीमा आहे. त्यामुळे भारतानेदेखील त्या भागात सैन्य तैनात केले आहे. चीनने आपले सैन्य मागे घेतल्यास भारतही सैन्य मागे घेईल, असे सरकारने स्पष्ट केले.  

माध्यमांनी वाद सोडवण्यावर भर  
भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले, मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये. आम्ही भूतान सरकारच्या संपर्कात आहोत. आम्हाला चीनसोबत सीमावादावर शांततापूर्वक प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे. त्यासाठी राजनयिक माध्यमांचा वापर केला जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेदेखील मुत्सद्देगिरीच्या पातळीवरील संवाद सुरू असल्याचे म्हटले आहे. परंतु सार्थक चर्चेसाठी भारताला डोकलाममधून सैन्य माघारी न्यावे लागेल.  

हिंदू राष्ट्रवाद युद्धाच्या दिशेने घेऊन जाईल : चिनी वृत्तपत्राचा दावा  
भारतात हिंदू राष्ट्रवादाचा एक अंकुर आहे. त्याने भारताच्या चीनसंबंधीच्या धोरणाचे अपहरण केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांत युद्ध होऊ शकते. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताला इशारा दिला आहे. राष्ट्रवादाच्या उत्साहात चीनच्या विरोधात सूड घेण्याची भावना भारतात व्यक्त होऊ लागली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात राष्ट्रवादी भावनांना पाठिंबा मिळाला आहे, असे लेखात नमूद करण्यात आले आहे. यू निंग लेखात म्हणाले, परराष्ट्र संबंध विशेषत: चीन व पाकिस्तानसारख्या देशांवर कडक कारवाईची मागणी आहे. वाढता धार्मिक राष्ट्रवाद भारताला आपल्या हितसंबंधाच्या बाबतीत अडचणीत आणणारा ठरेल. भारताने त्याबाबत सावध राहिले पाहिजे. धार्मिक राष्ट्रवादाने दोन्ही देशांना युद्धाच्या गर्तेत ढकलू नये.

डोभाल बीजिंग दौऱ्यावर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल २७ जुलै रोजी चीनला जाणार आहेत. बीजिंगमध्ये ते ब्रिक्स देशांच्या बैठकीत सहभागी होतील. त्यामुळे आता या चर्चेकडे लक्ष लागले आहे. 
 
काय आहे ताजा वाद ?
- चीनने सिक्कीम सेक्टरमधील डोकलाम येथे रस्ता निर्माण कार्य सुरु केले आहे. डोकलाम पठारवरच चीन, सिक्कीम आणि भूतान यांच्या सीमा एकत्र येतात. भूतान आणि चीन दोघेही या भागावर दावा सांगत आले आहेत. भारताचा भूतानला पाठिंबा आहे. भारतात हा भाग डोकलाम आणि चीनमध्ये डोंगलोंग नावाने प्रसिद्ध आहे. 
- चीनने जूनच्या सुरुवातीला येथे रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले होते. भारताच्या विरोधानंतर चीनने घुसखोरी करण्यास सुरुवात केली. चीनने भारताचे दोन बंकर तोडले. तेव्हापासून वादा चिघळला आहे. सीमेवर तणाव आहे. 
- सिक्किमचे मे 1975 मध्ये भारतात विलिनीकरण झाले होते. चीनने तर कधीच सिक्किमला भारताचा भाग मानले नाही. मात्र 2003 मध्ये चीनने सिक्किमला भारतीय राज्याचा दर्जा दिला. त्यानंतरही चीन सिक्किमधील अनेक भागावर आपला दावा सांगत राहिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...