आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी निमित्त सर्वच गरजवंतांना व्हिसा देणार भारत, सुषमा स्वराज यांचे आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळी निमित्त सर्वज गरजवंतांना भारतात येण्यासाठी व्हिसा देणार अशी घोषणा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. सुषमा यांनी पाकिस्तानातून आलेल्या कित्येक विनंतींवर सकारात्मक पावले उचलली आहेत. 
 
 
सुषमांनी केले ट्वीट...
- परराष्ट्र मंत्री ट्वीट करून म्हणाल्या, "आमच्याकडे दिवाळीचा पवित्र सण साजरा केला जात आहे. या निमित्त भारत सर्वच गरजवंतांना व्हिसा देणार आहे. व्हिसा संदर्भातील सर्व पेंडिंग काम आज सोडवले जातील."
- उल्लेखनीय बाब म्हणजे, सुषमा यांच्या ट्वीटला मिळालेल्या रिस्पॉन्सचे पीएम मोदींनीही कौतुक केले. 

2 दिवसांत दोन जणांची मदत
- 17 ऑक्टोबर रोजी सुषमा यांनी पाकिस्तानी मुलीच्या अर्जंट मेडिकल व्हिसावर तातडीने कारवाई केली. 5 वर्षांची ही मुलगी डोळ्याच्या कॅन्सरने ग्रस्त होती. 
- 18 ऑक्टोबर रोजी सुषमांनी इस्लामाबाद येथील भारतीय दूतावासाला पाकिस्तानी मुलाला व्हिसा देण्याबाबत सांगितले होते. 
- या मुलाचे वडील काशिफ यांनी ट्विटरवर व्हिसाची विनंती केली होती. मुलाच्या औषधी संपल्या असून लवकरात लवकर भारतात डॉक्टराचा सल्ला घ्यावा लागेल असे त्यांनी लिहिले होते. 
- सुषमांनी यासंदर्भात पाकिस्तानातील भारतीय दूतावासाला कळवल्यानंतर संबंधित वडिलांना रिप्लाय केला होता. आणि त्यांना मदत मिळणार असे आश्वासन दिले होते.
बातम्या आणखी आहेत...