आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा स्वराज यांचे पाकिस्तान दौऱ्यासंबंधी निवेदन, विरोधकांचा गदारोळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवेदन करताना सुषमा स्‍वराज. - Divya Marathi
निवेदन करताना सुषमा स्‍वराज.
नवी दिल्ली - 'पाकिस्तान संबंधाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, दोन्ही देशांनी दहशतवादाचा निषेध केला. दरम्यान, मुंबईवर 26/11 चा हल्ला करणाऱ्यांवर कडक करवाई करावी, अशी मागणी आम्‍ही पाकिस्‍तानकडे केली', अशी माहिती परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्‍वराज यांनी आज (सोमवार) राज्‍यसभेत दिली. मात्र, या मुद्दयावरून विरोधकांनी गदारोळ केला.
आप आणि तृणमूल काँग्रेसचे धरणे
दिल्लीच्‍या शकूर परिसरातील नियमाह्य वस्‍त्‍यांवर रेल्‍वे प्रशासनाने कारवाई केली. त्‍यामुळे असंख्‍य कुटुंब उघड्यावर आले. या विरोधात आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसच्‍या खासदारांनी धरणे आंदोलन केले. यावर रेल्‍वे मंत्री सुरेश प्रभू निवेदन करू शकतात, असे सांगितले जात आहे.
पंजाबमध्‍ये दोन युवकांचे हात-पाय कापले, संसदेत गोंधळ
पंजाबमध्‍ये शुक्रवारी दोन दलित युवकांचे हातपाय कापले. या मुद्दयावरून विरोधकांनी सोमवारी संसदेत चांगलाच गोंधळ घातला. त्‍यामुळे दुपारी 12 वाजतापर्यंत राज्‍यसभा स्‍थगित करण्‍यात आली. दरम्‍यान, पंजाब सरकार बरखास्‍त करावे, अशी मागणी विरोधकांनी केली.
काय आहे प्रकरण ?
- पंजाबमधील बोहर येथे शिरोममी अकाली इलाशी निगडित असलेले व्‍यावसायिक शिवलाल डोडा यांच्‍या फार्म हाउसमध्‍ये शुक्रवार दोन युवकांचे हात-पाय कापले. या दोघांवर 3 डिसेंबरला बलात्‍काराचा गुन्‍हा दाखल होता. यापैकी एकाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला तर दुस-याची प्रकृती गंभीर आहे.
UPDATES...
- 11:41 AM : बीएसपी चीफ मायावती म्‍हणाल्‍या, पंजाबचे प्रकरण खूप गंभीर आहे. त्‍यामुळे पंजाब सरकारला बरखास्‍त करावे.
- 11:22 AM : राज्यसभाचे कामकाज 11.30 पर्यंत स्थगित.
- 11:21 AM : उपसभापती कुरियन म्‍हणाले- तुमच्‍यापैकी काही लोक सभागृहाला काबुत घेण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत तर काही मनमानी करत आहेत.
- 11:19 AM : उपसभापती पी.जे. कुरियन - जर काही अडचण असेल तर जागेवर बसा. मी तुम्‍हाला बोलण्‍याची संधी देणार आहे.
- 11:18 AM : विरोधकांनी राज्यसभेत गदारोळ करून सरकार विरोधात ‘We want justice’ चे नारे लावले.
- 11:16 AM : राज्यसभेत सुषमा यांचे निवेदन संपले.
- 11:15 AM : लोकसभेत गदारोळ. कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित.