आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचे भारतात आगमन, केरी-स्वराज आज चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचे बुधवारी भारतात आगमन झाले. ते गुरुवारी 5 व्या भारत-अमेरिका सामरिक चर्चेत सहभागी होतील. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व केरी यांच्यात संरक्षण आणि ऊर्जेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील पारदर्शक संबंधांवर ही बैठक होईल.
बैठकीला संरक्षण तसेच गृह मंत्रालयाचे प्रतिनिधीदेखील हजर असतील. वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारमणदेखील चर्चेत सहभागी होतील. व्यापार क्षेत्रातील शक्यतांचा वेध घेण्यासाठी ही बैठक तितकीच महत्त्वाची मानली जाते. व्यापार क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याची भूमिका दोन्ही देशांकडून घेण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सीतारमण नवीन सरकारच्या व्यापारविषयक धोरणांना चर्चेत मांडतील. व्यापार सुविधाविषयक करारावर स्वाक्षरी करणार नाही. हा करार केवळ विकसित देशांसाठी पूरक ठरतो, असे भारताने स्पष्ट केल्याने अनेक देशांची मोठी बाजारपेठ असलेल्या देशातील प्रवेशाबाबत गोची झालेली आहे.

मुख्य मुद्दे : संरक्षण, ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास, प्रादेशिक मुद्दे.

पंतप्रधानांचीही भेट घेणार : तीन दिवसीय दौर्‍यात केरी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेतील, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.