आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरिस हल्ल्यानंतर अर्ध्यातून परतल्या सुषमा स्वराज, रद्द केला अमेरिका दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचा दौरा रद्द केला आहे. पॅरिस हल्ल्याची बातमी मिळताच सुषमा स्वराज अर्ध्या मार्गातून (त्या दुबईत थांबल्या होत्या) परतल्या होत्या. पॅरिसमध्ये ISIS ने केलेल्या हल्ल्यात 128 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेत जा जात होत्या स्वराज ?
सुषमा या लॉस एंजल्समद्ये प्रवासी भारतीय दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणार होत्या, अशी माहिती मिळाली आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी झाली आहे. आता परराष्ट्र राज्यमं६ी जनरल (रिटायर्ड) व्हीके सिंह रविवारी सुषमा स्वराज यांच्याऐवजी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे काय?
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नई दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिका दौऱ्यावर जाणाऱ्या सुषमा स्वराज यांना ट्रांझिट हॉल्टसाठी थांबवण्यात आले होते. यादरम्यान त्यांना पॅरिस हल्ल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी स्वतः हा दौरा रद्द केला.
बातम्या आणखी आहेत...