आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sushma Swaraj Demands Capital Punishment For Rapist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामुहिक बलात्‍काराच्‍या दोषींना फाशीच द्याः सुषमा स्‍वराज भडकल्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मुंबईतील वत्तछायाचित्रकार तरुणीवर झालेल्‍या सामुहिक बलात्‍काराचे पडसाद सोमवारीही संसदेत उमटले. लोकसभेत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी निवेदन दिल्‍यानंतर विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यांनी सरकारवर कडाडून हल्‍ला चढविला. जोपर्यंत बलात्‍कारातील आरोपींना फासावर चढवत नाही, तोपर्यंत असे गुन्‍हे वाढतच राहतील, असे त्‍यांनी उद्वेगाने सांगितले.

सुषमा स्‍वराज मुंबईतील प्रकरणावरुन चांगल्‍याच संतप्‍त झाल्‍या होत्‍या. सुशीलकुमार शिंदे यांनी सर्वप्रथम निवेदन करताना सांगितले की, दोषींना लवकरात लवकर शिक्षा होईल. त्‍यावरुन भडकलेल्‍या स्‍वराज 'लवकरात लवकर' या शब्‍दावर आक्षेप घेऊन म्‍हणाल्‍या, गेल्‍या वर्षी डिसेंबरमध्‍ये दिल्‍लीत झालेल्‍या बलात्‍कारप्रकरणातील गुन्‍हेगारांना आतापर्यंत शिक्षा झालेली नाही. 'दामिनी' प्रकरणानंतर सामुहिक बलात्‍कारासारख्‍या घटना वाढल्‍या आहेत. मी तर म्‍हणते एक-दोघांना फासावर चढवा, अशा घटना थांबतील. अशा गुन्‍हेगारांना फाशीच दिली पाहिजे.

दरम्‍यान, आज संसदेमध्‍ये मुंबईतील सामुहिक बलात्‍कार, विहिंपची 84 कोसी परिक्रमा आणि दिल्‍लीत समाजवादी पक्षाच्‍या कार्यालयावरील हल्‍ल्‍यावरुन प्रचंड गदारोळ झाला. राज्‍यसभेत समाजवादी पक्षाच्‍या सदस्‍यांनी गदारोळ घातल्‍यामुळे दोन वेळा कामकाज स्‍थगित करावे लागले. त्‍यानंतर लोकसभेतही प्रचंड गोंधळ झाला. परिक्रमेवरुन गदारोळ झाल्‍यानंतर दुपारी 2 वाजता कामकाज स्‍थगित करावे लागले.