आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी मुलीला व्हिसा देण्याचे स्वराज यांचे आदेश; दूतावासाला कार्यवाहीची सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत-पाकिस्तानचे सीमेवरील संबंध तणावाचे असले तरी तेथील नागरिकांना भारतात मदत मिळवून देण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सदैव तत्पर असतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. डोळ्याच्या कर्करोगाने ग्रस्त एका पाचवर्षीय पाकिस्तानी बालिकेला भारतात उपचारासाठी येण्यासाठी तत्काळ वैद्यकीय व्हिसा जारी करण्याचे आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्लामाबादस्थित भारतीय दूतावासाला दिले आहे. डोळ्याचा कर्करोग असलेल्या अनामता फारुख या पाकिस्तानी बालिकेच्या वडिलांनी यासंदर्भात सुषमा स्वराज यांच्याकडे याचना केली होती. स्वराज यांनी ट्विटरवरून सांगितले की,  बालिकेला उपचारासाठी तत्काळ वैद्यकीय व्हिसा जारी करण्याचे आदेश मी दिले आहेत. एका अन्य पाकिस्तानी बालकानेही कण्याच्या प्रत्यारोपणासाठी भारतात येण्यास व्हिसा मागितला आहे. या बालकासही उपचारासाठी व्हिसा देत आहोत. आम्ही त्या बालकाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असेही त्यांनी यात म्हटले आहे. 
 
एच१ बी व्हिसासाठी अमेरिकेच्या  शिष्टमंडळाशी चर्चा  
अमेरिकेत भारतीय नागरिकांना एच१ बी व्हिसा देण्याचा मुद्दा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी अमेरिकी काँग्रेसच्या ९ सदस्यीय शिष्टमंडळासमोर उपस्थित केला. अमेरिकी काँग्रेसने याप्रकरणी सहकार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.  दोन्ही देशांचे सामरिक संबंध उत्तम बनवण्यात अमेरिकी काँग्रेसने निभावलेल्या भूमिकेची स्वराज यांनी या वेळी प्रशंसा केली. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करून याची माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...