आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • सुषमा स्वराज यांच्यावर IPLचे माजी कमिश्नर ललीत मोदी यांना मदत केल्याचा आरोप

सुषमा स्वराज यांच्यावर IPLचे माजी आयुक्त ललीत मोदींना मदत केल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) माजी आयुक्त ललीत मोदी यांना मदत केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे आरोपी ललीत मोदी यांना सुषमा स्वराज मदत करत आहेत. या संबंधी एका इंग्रजी वृत्तवाहिनीने ईमेल आणि कागदपत्रे असल्याचाही दावा केला आहे. ललीत मोदी यांना ब्रिटनमधून बाहेर काढण्यासाठी सुषमा स्वराज यांनी स्वतः मदत करण्याचा प्रयत्न केला होता. 2013 मध्ये लोकसभेत अपक्ष नेतेपदी असताना सुषमा स्वराज यांनी त्यांच्या एका नातेवाईकाच्या ब्रिटनमधील प्रवेशासाठी ललीत मोदी यांची मदत घेतली होती, आणि त्याच्या बदल्यात त्यांनी ललीत मोदी यांची मदत केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
अपक्षांकडून राजीनाम्याची मागणी
ललीत मोदी यांच्याशी असलेल्या नात्याची बातमी बाहेर येताच अपक्षाकडून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, सुषमा स्वराज यांनी ललीत मोदी यांना मदत करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पंतप्रधान मोदी यांनी याबाबतीत स्पष्टीकरण द्यायला हवे की, त्यांना याबाबतीत माहिती होती की नाही. काँग्रेसने या मुद्दयावर दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.

ब्रिटनमधून बाहेर पडण्यासाठी केला आरोप
या आरोप प्रकरणाबाबत सुषमा म्हणाल्या की, "ललीत मोदी यांनी मला सांगितले होते की त्यांनी लंडनमधअये ट्रॅव्हेल डॉक्यूमेंटसाठी अप्लाय केले आहे आणि ब्रिटन सरकार प्रवासाची कागदपत्रे देण्यास तयार आहे. मात्र युपीए सरकारच्या एका सर्क्यूलरमुळे त्यांना असे करता येत नाही. कारण याचा भारत-ब्रिटन संबंधावर परिणाम होईल."