आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदीमुळे वादात अडकल्या सुषमा, पंतप्रधान पदासाठी बाळासाहेबांनी दिली होती पसंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या देशभरात चर्चेचा विषय झाल्या आहेत. वादग्रस्त आणि आयपीएलमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचाराचे आरोपी ललित मोदी यांना मदत केल्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. ललित मोदीवर लुक आऊट नोटीस असताना त्यांना ब्रिटनमधून पोर्तुगाल येथे जाण्यासाठी कागदपत्रांची मदत केल्याचा स्वराज यांच्यावर आरोप आहे. त्यासोबतच आता मोदी आणि त्यांच्यातील हितसंबंधाचे अनेक खुलासे समोर येत आहेत.
स्वराज यांची मुलगी बांसुरी ललित मोदीच्या लीगल पॅनलची सदस्य असल्याचे उघड झाले आहे. बांसुरीने आठ वेळा मोदीची कोर्टात बाजू मांडली आहे. त्याशिवाय सुषमा स्वराज यांचे पती कौशल स्वराज यांनी पुतण्याच्या अॅडमिशनसाठी ललित मोदीची मदत मागितल्याचाही आरोप होत आहे.
सुषमा स्वराज भारतीय जनता पक्षातील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. भाजपने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याआधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वराज यांच्या नावाला पसंती दिली होती. यातूनच त्यांचे पक्षातील आणि पक्षाबाहेरील वजन लक्षात येते. मात्र, मोदी प्रकरणाने विरोधक आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घेऊ या सुषमा स्वराज यांच्या विषयी ...