आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकशी लपूनछपून चर्चा नाही: स्वराज परराष्ट्रमंत्र्यांचे लोकसभा, राज्यसभेत निवेदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानशी नवी चर्चा लपूनछपून नव्हे तर परस्पर विश्वासाच्या आधारावर सुरू केली आहे. दहशतवादी गटांच्या इशाऱ्यानंतरही वाटाघाटीची प्रक्रिया अखंडित राहावी, हा प्रयत्न असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या दौऱ्यानंतर संसदेत सांगितले. स्वराज यांनी समग्र चर्चेचे समर्थन करत प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी शेजारी देशांच्या सहकार्याने आखाती देशांशी संबंध प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

दहशतवादाचा मुद्दा परराष्ट्र सचिवांऐवजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडून हाताळला जात आहे. भार आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोणत्याही प्रसिद्धीशिवाय बँकॉकमध्ये भेटले, याचा अर्थ तिसऱ्या देशाचा या प्रक्रियेत सहभाग आहे,असा होत नाही. अशा प्रकारची बैठक दिल्लीत होऊ शकत नाही,हे तुम्हालाही माहीत आहे. बँकॉकमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारामधील चर्चा उफा प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याचा भाग आहे, असे स्वराज यांनी लोकसभेत सांगितले. त्याआधी विरोधी खासदारांनी बँकाॅकमधील गुप्त चर्चेवरून प्रश्नांची सरबत्ती केली. स्वराज यांनी लोकसभा आणि राज्यसभेत एनएसए स्तरावरील चर्चेबाबत स्वत:हून निवेदन केले.
या दरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांचा गोंधळ सुरूच होता. विविध पक्षांच्या १३ सदस्यांच्या मांडल्यानंतर सरकारच्या पुढाकाराचे स्वागत केल्याबद्दल आभार मानले.

जेएनयूमध्ये लैंगिक छळाची २५ प्रकरणे
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात २०१३-१४ या वर्षांत लैंगिक छळाचे २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १०४ उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये हा आकडा जास्त असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील अहवाल संसदेत मांडण्यात अाला. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठात लैंगिक छळाची १५ प्रकरणे दाखल झाली. अलाहाबादच्या सॅम हिग्नबॉथम इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रीकल्चर संस्थेत अशा दहा प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत दिली.
बातम्या आणखी आहेत...