आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIIMS मध्ये झाले सुषमा स्वराज यांचे किडनी ट्रान्सप्लांट, 5.30 तास चालले ऑपरेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे एम्समध्ये किडनी ट्रान्सप्लांट झाले. साडे पाच तासांच्या ऑपरेशनमध्ये एका स्पेशलिस्ट टीमने किडनी ट्रान्सप्लांट केले. 7 नोव्हेंबरला सुषमा यांना किडनी फेल झाल्यामुळे एम्समध्ये दाखल केले होते. सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन आजाराची माहिती दिली होती.

- 16 नोव्हेंबरला त्यांनी ट्वीटरवरुन आपल्या आजाराची माहिती दिली होती.
- ट्विटमध्ये म्हटले होते की, ‘मित्रांनो, तुम्हाला माझ्या प्रकृतीविषयी माहिती द्यायची आहे. किडनी फेल झाल्यामुळे मी एम्समध्ये दाखल आहे. सध्या मी डायलिसिसवर आहे. किडनी प्रत्यारोपणासाठी मी चाचण्या करत आहे. भगवान कृष्ण आशीर्वाद देतील.’
- यानंतर अनेक लोकांनी सुषमा यांना किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. सुषमा यांना मागिल 20 वर्षांपासून डायबिटीज आहे.
- सुषमा स्वराज यांना एप्रिलमध्येदेखील एम्समध्ये अॅडमिट केले होते. तेव्हा त्यांना निमोनिया आणि दुस-या समस्या सांगितल्या होत्या.
- हॉस्पिटलमध्ये असूनही सुषमा टि्वटरवर अॅक्टिव राहतात.
बातम्या आणखी आहेत...