आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वराज यांचा ग्लोबल थिंकर्स लिस्टमध्ये सामावेश, मेहनती परराष्ट्रमंत्र्यांचा अभिमान- मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन/नवी दिल्ली: ट्विटरवर लोकांच्या मदतीस तत्पर असणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना फॉरेन पॉलिसी मॅग्झिनने 2016 च्या ग्लोबल थिंकर्स लिस्टमध्ये सामावेश केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन त्यांचे अभीनंदन केले आहे. मोदींनी बुधवारी ट्वीटर वर सुषमांचे अभिनंदन करतांना लिहीले की, "सुषमा स्वराज फॉरेन पॉलिसी ग्लोबल थिंकर्स लिस्ट 2016 चा भाग बनल्या आहेत, मला अशा मेहनती परराष्ट्रमंत्र्यांवर खुप गर्व आहे. " फॉरेन पॉलिसी मैगजीनने ट्विटर डिप्लोमेसी च्या ब्रॅंडला फॅशनमध्ये आणण्यासाठी सुषमाची स्तुती केली आहे.

लिस्टमध्ये आणखी कोणाला मिळाली जागा...
- न्यूज एजंसी च्या मते रराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या व्यतीरिक्त सामाजिक काम करणाऱ्या भारतीय दांम्पत्य अनुपमा आणि विनीत नायर यानाही ग्लोबल थिंकर्स लिस्ट मध्ये स्थान मिळाले आहे.
- सुषमा स्वराज यांचे नावाचा सामावेश हिलेरी क्लिंटन यांच्या सोबत डिसीजन मेकर्स कॅटॅगरीमध्ये करण्यात आला आहे.
- या कॅटॅगरीत यूएन सेक्रेटरी जनरल बान की मून, जर्मन चांसलर एंगेला मर्केल आणि यूएस अटॉर्नी जनरल लॉरेटा लिंच याचाही सामावेश आहे.
- मॅगझीनने या लिस्ट मध्ये एकुणन100 लीडिंग ग्लोबल थिंकर्सचा सामावेश केला आहे.

सुरेश प्रभुंनीही केले अभिनंदन
- सुषमा स्वराज यांचे 10 डिसेंबरला किडनी ट्रांसप्लान्ट चे ऑपरेशन झाले. मंगळवारी त्यांना आईसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले.
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनीही ट्वीट करुन सुषमांचे अभिनंदन केले आहे.
- प्रभु यांनी लिहीले की, "अद्भुत कामासाठी सन्मानीत करण्यात आल्याबद्दल सुषमा स्वराज यांना शुभेछा, आम्हा सर्वांना तुमच्यावर गर्व आहे."
मॅगझीन ने सुषमांसाठी काय लिहिले?
- सुषमा स्वराज यांनी यमन येथिल भारतीयांना वापस आणण्यत आणि त्यांचे हरवलेले पासपोर्ट परत मिळवून देण्यात मदत केली होती. मॅगझीनने त्यांच्या या कामाची प्रशंसा केली आहे.
- मॅगझीनने लिहिले आहे की, "सुषमांनी या कामासाठी ट्विटरचा आक्रामक वापर करत निकनेम द कॉमन ट्विपल्स लीडर प्राप्त केले आहे."

भारतीय दाम्पत्यासाठी काय म्हंटले?
- मॅगझीनने संपर्क फाउंडेशन च्या को-फाउंडर्स नायर दांम्पत्यांना 'द मुगल्स' सेगमेंटमध्ये स्थान दिले आहे. त्यांच्याबद्दल लिहिताना, "यांनी टेक्नोलॉजी चा असा वापर आसा रस्ता दाखवला आहे ज्याने मुलं शिकु शकणार आहेत." असे म्हंटले आहे.
- "आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून HCL टेक्नोलॉज चे माजी एग्जीक्युटिव आणि त्यांची पत्नी ग्रामीण भारतात प्राइमरी एजुकेशन सिस्टमच्या विकासाच्या मिशनवर आहेत. यासाठी ते स्वस्त टेक्नोलॉजी टूल्स चा वापर करत आहेत."
- "त्यांनी स्मार्ट क्लास किट्स बनवल्या आहेत. ज्यात अनेक स्वस्त शोधांचा सामावेश आहे, जसे की एक प्लास्टिक ऑडियो उपकरण जे इंग्रजी शब्दांची ओळख करते. या किट चा पुरवठा करण्यासाठीची एका वर्षाची किंमत केवळ 1 अमेरिकी डॉलर प्रति विद्यार्थी आहे."
- नायर दांम्पत्यांचा छत्तीसगढ़ आणि जम्मू-कश्मीर च्या जवळील 50 हजार शाळांमध्ये या किटचा पुरवठा करण्याचा त्याची त्याची इच्छा आहे.

या भारतीयांनीही बनवली लिस्टमध्ये जागा...
- ग्लोबल थिंकर्स लिस्ट 2016 मध्ये जागा मिळवणाऱ्या इतर भारतीयांमध्ये नीतेश कादयान, निखिल कौशिक आणि ग्रॅविकी लॅब्स चे अनिरुद्ध शर्मा याचाही सामावेश आहे.
- ग्रॅविकी लॅब्स एक इंडियन फर्म आहे ज्यात पॉल्युटेड हवे चा कलेच्या वस्तु बनवण्यासाठी वापर करतात.
- इम्यूनोलॉजिस्ट गुरुशरण प्रसाद तलवार यांचाही या लिस्टमध्ये सामावेश आहे. त्यांनी एक असा डोस विकसीत केला आहे, ज्याने 3 वर्षात कुष्ठरोग 65 टक्के कमी केला जाउ शकतो.
मॅगझीनने लिहीले आहे की, "ग्लोबल थिंकर्स चा सन्मान याचा पुरावा आहे की, समाजाचे आधार जरी डगमगले तर त्यांचा भार उचलण्यासाठी यांनी पावले उचलली आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा मोदीं ट्वीटवर काय म्हणाले...
बातम्या आणखी आहेत...