आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कोल' गेटमधील आरोपीच्या पासपोर्टसाठी काँग्रेस नेत्याचा दबाव : सुषमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ललित मोदी प्रकरणात वादात अडकलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोळसा घोटाळा प्रकरणातील आरोपीला डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने दबाव निर्माण केल्याचा आरोप केला आहे. त्या नेत्याचे नाव आज संसदेत सांगणार असल्याचे सुषमा स्वराज म्हणाल्या. या नेत्याने कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बागरोदियाला डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांचा दावा आहे.

सुषमा स्वराज यांचे ट्विट
बुधवारी सुषमा स्वराज यांनी केलेल्या ट्विटमध्ये, एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बागरोदिया याला डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. त्या नेत्याचे नाव मी संसदेत सांगेल, असा मजकूर होता. सुषमा आज ललिच मोदी प्रकरणावर संसदेत स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.

कोण आहे संतोष बागरोदिया
संतोष बागरोदिया राजस्थानचे काँग्रेस नेते आणि तीन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. मंगळवारी कोळसा घोटाळ्याची सुनावणी करताना स्पेशल सीबीआय जज भरत पराशर यांनी समन्स जारी करत संतोष बागरोदिया, एचसी गुप्ता आणि एलएस जनोती यांना 18 ऑगस्टला सादर होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर सुषमा यांनी हे ट्विट केले. बागरोदिया यांच्यावर कोळसा घोटाळ्यातील एएमआर आयर्न अँड स्टील कंपनीला महाराष्ट्रातील बंदेर कोल ब्लॉक अवैधरित्या दिल्याचा आरोप आहे. ते काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीही होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सुषमा स्वराज यांचे ट्विट...
बातम्या आणखी आहेत...