आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींशी संबंधीत माहिती RTI अंतर्गत देण्यास स्वराज यांच्या मंत्रालयाचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना ब्रिटनमधील प्रवासासाठी ट्रॅव्हल डॉक्यूमेंट उपलब्ध करुन देण्याच्या आरोपात अडकलेल्या सुषमा स्वराज यांच्या मंत्रालयाने आणखी एक कारनामा केला आहे. यामुळे सुषमा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे. सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वातील परराष्ट्र मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागण्यात आलेली ललित मोदीच्या पासपोर्ट संबंधीत माहिती देण्यास नकार दिला आहे. मंत्रालयाला माहिती अधिकारात सात प्रश्न विचारण्यात आले होते, त्यात एक प्रश्न होता, की मोदीला पासपोर्ट देण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील न करण्याचा निर्णय कोणाचा होता ?
काय म्हणाले परराष्ट मंत्रालय ?
आरटीआय कार्यकर्ते रायो यांनी परराष्ट्र मंत्रालयाला ललित मोदींच्या पासपोर्ट संबंधी माहिती विचारली आहे. त्यांना मंत्रालयाने पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे, 'तुम्ही विचारलेले एक ते तीन क्रमांकापर्यंतचे प्रश्न माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत येत नाहीत. क्रमांक चार ते सात पर्यंतच्या प्रश्नांची परराष्ट्र मंत्रालयाकडे माहिती उपलब्ध नाही.' या उत्तरांसह परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की तुमचा अर्ज पासपोर्ट आणि व्हिसा तसेच अर्थ आणि गृह मंत्रालयाकडे त्याचबरोबर महावाणिज्यदूतांकडे पाठवण्यात आला आहे.

हरियाणाचे आरटीआय कार्यकर्ते रायो यांनी मंत्रालयाला 19 जून रोजी ललित मोदीसंबंधी माहिती विचारली होती. त्याच दरम्यान, सुषमा स्वराज यांच्यावर मोदींवरुन आरोप सुरु झाले होते.

काय होते प्रश्न
रायो यांच्या अर्जात पहिल्या तीन प्रश्नांमध्ये विचारण्यात आले होते, की सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना पोर्तुगालला जाण्यासाठी मानवतेच्या आधारावर मदत केली होती, तर त्यांनी मोदींना भारतीय उच्चायुक्तांकडे अर्ज करण्याचा सल्ला का दिला नाही. पुढचा प्रश्न होता, की परराष्ट्र मंत्री स्वराज यांनी मोदीला प्रवासासाठी दस्ताऐवज मिळवून देण्याची मदत केली त्याचवेळी भारतात परत येण्याची अट का घातली नाही? प्रश्न क्रमांक चार ते सातमध्ये विचारण्यात आले होते, की अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहाण्यास नकार देणाऱ्या ललित मोदीला ब्रिटनमध्ये राहाण्यास परवानगी देण्याबद्दल आक्षेप घेतला की नाही ?
परराष्ट्र मंत्रालयाकडे सादर करण्यात आलेल्या अर्जात ललित मोदीने भारतात आल्यास माझ्या जीवाला धोका आहे, या त्याच्या दाव्यावर मंत्रालयाचे काय म्हणणे आहे असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.