आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspecting Sadhu To Be Netaji Wb Intelligence Snooped On Him For Years

पश्चिम बंगाल IB ने केली साधूची हेरगिरी, \'नेताजी\' असल्याची होती शंका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पश्चिम बंगालचा गुप्तचर विभाग (आयबी) अनेक वर्षे एका बाबाचा माग काढत होता. आयबीला शंका होती, की हा बाबा दुसरा तिसरा कोणी नसून नेताजी सुभाषचंद्र बोस आहे. एका इंग्रजी दैनिकाने आयबी बाबाची हेरगिरी करत असल्याचा दावा केला आहे. त्याचे अनेक दस्तऐवज हाती लागल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच अशी कागदपत्रे उघड झाली की त्यामुळे तत्कालिन काँग्रेस सरकार - विशेषतः माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. नेताजींच्या कुटुंबियांनी देखील आरोप केला की तब्बल 20 वर्षे त्यांच्या कुटुंबावर पाळत ठेवली जात होती. हे कोणाच्या इशाऱ्याने चालले होते याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी नुकतेच जर्मनीच्या दौऱ्यावर असताना नेताजींच्या नातवाने त्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती, पंतप्रधानांनी त्यांना होकारार्थी उत्तर दिले होते.
रहस्यमय बाबा
दस्तऐवजातील उल्लेखानुसार, 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे एक बाबा आले होते. त्यांनी शॉलमरी आश्रमात आश्रय घेतला होता. लोक त्यांना शारदानंद बाबा तर काही शॉलमरी बाबा म्हणून ओळखत होते. या बाबाने कधीही त्यांचा फोटो काढू दिला नाही. 1962 मध्ये बाबा कुठे तरी प्रवासासाठी जाणार होते तेव्हा त्यांच्यासाठी एक टॅक्सी मागवण्यात आली. ते टॅक्सीत बसल्यानंतर ती टॅक्सी झाकून घेण्यात आली होती, जेणे करुन बाहेरच्यांना आत कोण आहे ते दिसू नये.

एका दस्तऐवजात उल्लेख आहे, की बाबा कायम मफलरने आपला चेहरा झाकून ठेवत होते. त्यांनी कधीही त्यांचे ब्लड सँपल आणि एक्स-रे काढू दिला नाही. 1963 च्या एका रिपोर्टनुसार या बाबाला केवळ एक फुफ्फुस होते.
अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल असे बोलले जाते, की 1945 च्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पण या दाव्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. एका दस्तऐवजानुसार शॉलमरी बाबा किंवा शारदानंद बाबा हे गुढ रहस्य आहे. याच दस्तऐवजात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, बाबा त्यांचा फोटो काढण्यास का मनाई करत होते. का त्यांचा चेहरा कायम मफलरमागे झाकलेला असायचा. याशिवाय कोणत्याही वस्तूला हात लावण्याआधी बाबा हाताला रुमालाने गुंडाळून घेत. ज्यामुळे फिंगर प्रिंट्स उमटणार नाही. एका दस्तऐवजात उल्लेख आहे, की 1963 मध्ये 500 लोकांची एक बैठक झाली आणि तिथे उपस्थित वक्त्यांनी दावा केला की शारदानंद बाबा हेच खरेखुरे सुभाषचंद्र बोस आहे.
सहकार्यांचाही तोच दावा
1941 मध्ये नेताजी काबुलमध्ये उत्तमचंद्र मल्होत्रा यांच्याकडे थांबले होते. त्यांनी देखील दावा केला होता, की शारदानंदर बाबा हे दुसरे कोणी नसून नेताजी सुभाषचंद्र बोसच आहेत. वास्तविक शॉलमरी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हे सर्व दावे फेटाळले आहेत. शारदानंद बाबा उर्फ शॉलमरी बाबा 1960 नंतर चार-पाच वर्षे पश्चिम बंगालमध्ये राहिले नंतर ते उत्तराखंडमध्ये गेल्याचे सांगण्यात येते. त्यानतंर 1977 मध्ये त्यांचे निधन झाले.