आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspend Four Officers, Arvind Kejriwal Threaten Centre Government

चार पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा, अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारला धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टी (आप) सरकारने दिल्ली पोलिसांविरुद्धच आघाडी उघडली आहे. कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या चार पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा, अन्यथा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर धरणे देऊ, अशी धमकी खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
केजरीवाल यांनी याप्रकरणी शुक्रवारी नायब राज्यपाल नजीब जंग व त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही भेट घेतली, पण त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
केजरीवाल यांची नायब राज्यपालांशी सुमारे एक तास चर्चा झाली. त्याच वेळी पोलिस आयुक्त बी. एस. बस्सी आपल्या चार अधिकार्‍यांना घेऊन तिथे आले.केजरीवाल यांच्यासमवेत त्यांचे मंत्री सोमनाथ भारती, मनीष शिसोदिया आणि राखी बिडलान याही होत्या. जंग यांनी या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. कुणालाही निलंबित केले जाणार नाही, असे बस्सी यांनी स्पष्ट केले आहे. जंग यांच्या भेटीनंतर शिसोदिया पत्रकारांना सामोरे गेले. ते म्हणाले, दिल्लीत महिलांवर अत्याचार होत आहेत. सेक्स आणि मादक पदार्थांचे रॅकेट चालतात. पोलिस काहीच करीत नाहीत. हे शीला दीक्षित यांचे सरकार नाही. आमचे सरकार कोणतेही बहाणे ऐकणार नाही. पोलिसांना काम कारावेच लागेल. आम्ही सागरपूर, मालवीय नगर आणि पहाडगंजच्या ठाणे अंमलदार व सहायक पोलिस आयुक्तांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
निलंबनाची मागणीच का ?
0मालवीयनगर पोलिसांनी अमली पदार्थ आणि सेक्स रॅकेट सुरू असलेल्या ठिकाणी धाडी घालण्यास नकार दिला, असा कायदामंत्री सोमनाथ भारती यांचा आरोप आहे.
0पहाडगंज भागात 14 जानेवारी रोजी डेन्मार्कच्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाला होता.
0सागरपूर पोलिस हुंड्यासाठी छळ करणार्‍या एका कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कुटुंबाने आपल्या सुनेस जाळून हत्या केल्याचा आरोप महिला व बालविकासमंत्री राखी बिर्ला यांनी केला आहे.