आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspend Kanhaiya Kumar, Investigation Committee Recommendation

कन्हैयाकुमारला निलंबित करा, चाैकशी समितीची शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू)विद्यार्थी संघाचा नेता कन्हैयाकुमार, उमर खालिद व अनिर्बाण यांच्यावर देशद्रोहाचा खटला असून सध्या हे तिघेही अंतरिम जामिनावर सहा महिन्यांसाठी सुटले अाहेत परंतु विद्यापीठाच्या प्रशासनाच्या चाैकशी समितीने या तिघांसह श्वेता राज अाणि ऐश्वर्या अधिकारी अशा पाच जणांना दाेन सत्रासाठी निलंबित करण्याची शिफारस केली अाहे. असे झाल्यास यांची शिष्यवृत्तीही रद्द केली जाईल. मात्र, याबाबत अंतीम निर्णय कुलगुरु घेणार असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला सुत्रांनी दिली.

कन्हैयाने ९ फेब्रुवारी राेजी विद्यापीठ परिसरात एका कार्यक्रमात अफजल गुरुचे समर्थन केले हाेते. त्याच्यासह अन्य विद्यार्थ्यांनीही घाेषणाबाजी केली हाेती, या घाेषणाबाजीत अनेक चित्रफिती साेशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली असून त्यात देशद्राेही घाेेषणाबाजी केल्याचे दिसले होते.

पाचही विद्यार्थ्यांना नोटिसा
कुलगुरुंनी या शिफारशीवर शिक्कामाेर्तब केले तर शिक्षेच्या काळात हे पाचही विद्यार्थी वर्गात बसू शकणार नाहीत, परीक्षाही देता येणार नाही. त्यांची शिष्यवृत्तीही रद्द होऊ शकते. यासाठी प्रशासनाने या पाचही विद्यार्थ्यांना नाेटीस दिली. मात्र, विद्यापीठाच्या परिसरात अतिथी म्हणून राहू शकतील.