आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील 1993 च्या बाॅम्बस्फाेटातील दाेषी ताहिर मर्चंटच्या फाशीला स्थगिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मुंबईतील १९९३ च्या बाॅम्बस्फाेटातील दाेषी ताहिर मर्चंट याच्या फाशीच्या शिक्षेला सर्वाेच्च न्यायालयाने साेमवारी स्थगिती दिली. राज्य सरकारच्या टाडा विशेष न्यायालयाने ७ सप्टेंबर राेजी ताहिर व फिराेज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली हाेती. त्याला ताहिरने अाव्हान दिले हाेते. साेमवारी या याचिकेवर सुनावणी देताना सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारला टाडा न्यायालयाचे रेकाॅर्ड सहा अाठवड्यांत सादर करण्याचे अादेश दिले अाहेत. तसेच सीबीअायलाही नाेटीस बजावली अाहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्च राेजी हाेईल. या खटल्यात खाेटे पुरावे सादर करून अापल्याला गाेवण्यात अाल्याचा दावा अाराेपी ताहिरने केला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...