नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच (
आप) ची आज राष्ट्रीय परिषद आज (सोमवार) सुरू झाली. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद
केजरीवाल यांनी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. यावर
केजरीवाल म्हणाले, ''मी आताही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. लालू यांनीच माझ्याशी हस्तांदोलन केले. नंतर हात ओढत गळाभेट घेतली,'' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
20 नोव्हेंबर रोजी पाटणा येथील गांधी मैदानावर नितीशकुमार यांचा शपथविधी झाला होता. याला केजरीवाल उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमा लालूंची गळाभेट घेतली होती. यामुळे भाजपच्या हातात आयतेच कोलीत सापडले. त्यांनी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी या गळाभेटीचे पोस्टर लावले.
परिषदेत झाला गोंधळ
'आप'ची अलीपूर मध्ये परिषद सुरू आहे. दरम्यान, या ठिकाणी मीटिंग वेन्यूच्या बाहेर पक्षातील निलंबित सदस्यांनी गोंधळ घातला. मीटिंग सुरू होताच निलंबित नेते पोहोचले. त्यांनी आप आणि केजरीवाल यांच्या विरोधात नारेबाजी केली. एवढेच नाही तर पक्षाचे नाव 'आप' नाही तर 'खाप' आहे, असा आरोपही त्यांनी केला.
निलंबित नेत्यांनी काय म्हटले ?
गोंधळ घातलणाऱ्यांनामध्ये पक्षाचे संस्थापक सदस्यसुद्धा आहेत. त्यांना या परिषदेसाठी निमंत्रण दिले गेले नाही. 40 जणांना तीन दिवसांपूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
शांती भूषण यांनी केली टीका
> पक्षाचे संस्थापक सदस्य शांती भूषण यांनी रविवारी केजरीवाल यांच्यावर टीका केली. त्यांनी मागील दोन बैठकीचा उल्लेख करताना केजरीवाल यांना हुकूमशाह म्हटले.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...