आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suspended MPs Registered Dislike About Separate Telengana State

निलंबित खासदारांनी राजधानी दिल्लीत तेलगू गाणी गाऊन तेलंगणा निर्मितीचा केला निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तेलगू देसम पक्षाच्या निलंबित चार खासदारांनी राजधानी दिल्लीत तेलगू गाणी गाऊन व विविध वाद्ये वाजवून तेलंगणा निर्मितीचा निषेध केला. निलंबित खासदारांनी अखंड आंध्र प्रदेशच्या समर्थनार्थ संसदेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. दरम्यान, अखंड राज्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची केद्राने दाखल घेतली आहे. कॉँग्रेसचे नेते ए. के. अ‍ॅँटनी यांच्या अध्यक्षतेखालील समिती पावसाळी अधिवेशनानंतर आंध्र प्रदेशमध्ये जाऊन लोकांचे म्हणणे ऐकून घेणार आहे.


आम्हाला सभागृहात प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे आम्ही संसदेबाहेर निदर्शने करण्याचे ठरवले आहे, असे खासदार वेणुगोपाल रेड्डी यांनी सांगितले. या वेळी खासदार एन. ख्रिताप्पा, के. एन. राव आणि एन. शिवप्रसाद यांची उपस्थिती होती. खासदारांच्या हातात आंध्र बचाव, खासदारांचा आदर करा, त्यांच्या संख्येचा नको, या आशयाचे फलक होते. तेलंगणाच्या मुद्द्यावर गोंधळ घातल्याबद्दल तेलगू देसमचे चार व कॉँग्रेसच्या पाच खासदारांना 2 सप्टेंबर रोजी संसदेच्या उर्वरित अधिवेशन काळासाठी निलंबित केले होते.


अ‍ॅँटनी समिती भेट देणार : अखंड आंध्र प्रदेशच्या समर्थनार्थ सीमांध्र भागात दिवसेंदिवस आंदोलन चिघळत आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅँटनी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळ पावसाळी अधिवेशनानंतर आंध्र प्रदेशला भेट देणार आहे. सीमांध्र भागातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांनी मंगळवारी रात्री ए. के. अ‍ॅँटनी यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. यानंतर अ‍ॅँटनी यांच्या नेतृत्वाखाली पथक आंध्र प्रदेशला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.