आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suspension Of Durgashakti Challenging In Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्गाशक्तींच्या निलंबनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान ; याचिकेत राज्य, केंद्र प्रतिवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभरात गाजलेल्या निलंबित आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपालप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. दुर्गाशक्ती यांच्यावरील कारवाईविरुद्ध मंगळवारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. निलंबनाला विरोध करणा-या याचिकेत उत्तर प्रदेश व केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. दुर्गाशक्ती यांच्यावतीने वकील एम.एल. शर्मा यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.


चुकीची कामे करणा-यांवर कारवाईचा बडगा :अखिलेश
देशभरातून टीका होत असली तरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आपल्या भूमिकेचे समर्थन करत आहेत. एवढेच नव्हे, तर राज्यात चुकीची कामे करणा-या अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे अखिलेश यांनी मंगळवारी जाहीर करून नवीन हादरा दिला आहे.


दुर्गा यांचे पंजाबमध्ये स्वागत
मुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी दुर्गाशक्ती नागपाल यांना पंजाब राज्यात येण्याचे आवाहन केले आहे. त्यांना जर आपल्या मूळ गावी येण्याची इच्छा असेल तर त्यांचे सदैव स्वागत आहे. त्या मूळच्या मोहालीच्या आहेत.


वक्फ बोर्डाने हात झटकले
आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांना आपल्याच एका समितीकडून देण्यात आलेल्या क्लीन चिटशी आपला संबंध नाही. क्लीन चिट देणारे समितीचे सचिव कादीर खान हे काही बोर्डाचे सदस्य नाहीत, असे सुन्नी सेंट्रल वक्फ बोडाचे अध्यक्ष झुफुर फारुकी यांनी सांगितले.


‘दुर्गाशक्ती यांना सलाम’

वाळू माफियांच्या विरोधात ठामपणे भूमिका घेऊन बेकायदा कामांना थांबवण्याचे मोठे काम दुर्गाशक्ती यांनी केले आहे. म्हणूनच निलंबन नव्हे, तर त्यांना सलाम केला पाहिजे, असे केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.