आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Swachh Survekshan 2017: Indore, Bhopal, Visakhapatnam, Mysore Cleanest City Of India

स्वच्छ शहर यादीत महाराष्ट्राची घसरण: औरंगाबादपेक्षा नाशिक, जळगाव, उस्मानाबाद स्वच्छ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुरुवारी देशातील ४३४ शहरांची नावे घोषित करण्यात आली. यात मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळने अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला. पण मागील वर्षीच्या तुलनेत स्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्राची मोठी घसरण झाली आहे. २०१६ मध्ये घोषित ७३ शहरांच्या यादीत आघाडीच्या ५० शहरांमध्ये राज्यातील ८ शहरे होती. यंदा हा आकडा तीनपर्यंत खाली घसरला. देशाचा विचार करता गुजरातमधील १२, मध्य प्रदेश ११, आंध्र प्रदेशातील ८ शहरे पहिल्या ५० मध्ये आहेत.  

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात ४३४ शहरांमध्ये स्वच्छतेबाबत सर्वेक्षण झाले. संबंधित नगरपालिकांनी स्वत:ला दिलेली श्रेणी, नागरिकांचे मत, अधिकाऱ्यांमार्फत स्थळपाहणी करून गुणांकन केले गेले. महाराष्ट्रातील नवी मुंबई वगळता इतर शहरांनी निराशाजनक कामगिरी केली. मागच्या वर्षी मिळवलेली श्रेणीही कायम ठेवण्यात त्यांना अपयश आले. मुंबई, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या शहरांची मोठी पीछेहाट झाल्याचे दिसते. २०१६ मध्ये ७३ शहरांच्या यादीत राज्यातील १० शहरे होती. यंदा ४३४ पैकी ४३ शहरे महाराष्ट्रातील आहेत. मराठवाड्याच्या राजधानीचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादची स्थिती अतिशय वाईट आहे. औरंगाबादच्या तुलनेत (२९९) शिर्डी (५६), नांदेड (१९२), उस्मानाबाद (२१९), परभणी (२२९), यवतमाळ (२३०), अमरावती (२३१), इचलकरंजी (१४१), उदगीर (२४०), बार्शी (२८७) ही शहरे स्वच्छतेच्या बाबतीत अधिक जागरूक दिसतात. बीड (३०२), लातूर (३१८), जालना (३६८) ही मराठवाड्यातील शहरे स्वच्छ शहरांच्या यादीत खूप मागे गेली आहेत.
 
भुसावळ शेवटून दुसरे, महाराष्ट्र पिछाडीवर
434 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील 44 शहरांचा समावेश आहे. मात्र, टॉप 100 शहरांमध्ये राज्यातील केवळ 7 शहरांना जागा मिळाली आहे. राज्यातील नऊ शहरांना तर 300 च्या पलीकडे आहेत. भुसावळला शेवटून दुसरे, अर्थात 433 वे स्थान मिळाले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र मागे पडल्याचे दिसून येत आहे.
 
महाराष्ट्रातील 44 शहरांची यादी आणि प्राप्त गुण
शहर देशात क्रमांक 2000 पैकी प्राप्त गुण
नवी मुंबई 8 1705
पुणे 13 1660
बृहन्मुंबई 29 1535
शिर्डी 56 1397
पिंपरी चिंचवड 72 1320
चंद्रपूर 76 1315
अंबरनाथ 89 1272
सोलापूर 115 1213
ठाणे  116 1206
धुळे 124 1187
मिरा भायंदर 130 1172
नागपूर 137 1158
वसई - विरार 139 1142
इचलकरंजी 141 1133
नाशिक 151 1106
सातारा  157 1090
कुलगाव बदलापूर 158 1090
जळगाव 162 1083
पनवेल 170 1065
कोल्हापूर 177 1048
नंदूरबार 181 1037
अहमदनगर 183 1034
नांदेड वाघाळा 192 1010
उल्हासनगर 207 974
उस्मानाबाद 219 949
परभणी 229 924
यवतमाळ 230 924
अमरावती 231 922
कल्याण डोंबिवली 234 919
सांगली मिरज कुपवाड 237 911
मालेगाव 239 911
उदगीर 240 910
बार्शी 287 813
अकोला 293 798
औरंगाबाद 299 794
बीड  302 783
अचलापूर 311 761
वर्धा 313 760
लातूर 318 751
गोंदिया 343 705
हिंगणघाट 355 657
जालना 368 626
भिवंडी निजामपूर 292 571
भुसावळ 433 345
 
देशातील 10 सर्वात स्वच्छ शहरांची यादी
शहर 2017 2014
इंदूर (मध्यप्रदेश) 1 149
भोपाळ (मध्यप्रदेश) 2 105
विशाखापट्टनम (आंध्र) 3 205
सुरत (गुजरात) 4 63
म्हैसूर (कर्नाटक) 5 1
तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) 6 2
NDMC(दिल्ली) 7 15
नवी मुंबई (महाराष्ट्र) 8 3
तिरुपति (आंध्र) 9 137
वडोदरा (गुजरात) 10 -
 
पुढील स्लाईड्सवर वाचा... एकूण गुणांची विभागणी, अभियानाचा हेतू...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...