आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swami Alleges That Rahul And Sonia Gandhi Both Are Commission Agent

राहुल-सोनिया कमिशन एजंट, 2.5 लाख कोटींची मालमत्ता, स्वामींचा नवा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजप नेेते सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कमिशन एजंट म्हटले आहे. स्वामी यांनी गुरुवारी अहमदाबादेत एका पत्रकार परिषदेत या दोघांवर आरोप केले.
राहुल गांधी नेते नसून ते कमिशन एजंट आहेत. तसेच सर्व काँग्रेस नेते कमिशन एजंट आहेत. राहुल गांधींनी कमिशनसाठी अनेक कंपन्या तयार केल्या आहेत. राहुल गांधी आणि सोनिया यांच्याकडे 2.5 लाख कोटी किमतीची प्रॉपर्टी असून ती देशाच्या प्राप्तीकराच्या रकमेपेक्षा जास्त असल्याचा आरोपही स्वामी यांनी केला आहे.

फ्रान्सच्या कंपनीकडूनही कमिशन
भाजप नेते स्वामी म्हणाले की, सोनिया आणि राहुल कंपन्यांच्या डायरेक्टर्समार्फत कमिशन मिळवतात. त्यामध्ये फ्रान्सच्या एका कंपनीचाही समावेश आहे. ही कंपनी भारताला पाणबुड्यांचे 20 हजार कोटी किमतीचे पार्ट्स पुरवते. राहुल गांधी तुर्कस्तानसह इतर देशांचे नागरिक आहेत किंवा नाही, याचा शोध घेणार असल्याचेही स्वामी म्हणाले.

आधीही केले होते आरोप
याच आठवड्यात स्वामी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यात आरोप करण्यात आला होता की, राहुल गांधींनी स्वतः ब्रिटिश नागरिक असल्याचे सांगितले आहे. स्वामी यांच्या आरोपानुसार बॅकप्स लिमिटेड नावाच्या कंपनीच्या वार्षिक रिटर्नमध्ये राहुल गांधींनी स्वतःला ब्रिटिश नागरिक असल्याचे घोषित केले आहे. ही कंपनी 2003 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि 2009 मध्ये बंद झाली होती. राहुल गांधींची खासदारही आणि भारतीय नागरिकत्त्व रद्द करावे अशी मागणी स्वामी यांनी केली होती.