आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Caravan कडून असीमानंदांच्या मुलाखतीचे ट्रांस्क्रिप्ट प्रसिद्ध, अनेक गौप्यस्फोटांचा उलगडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - Caravan मासिकाने प्रकाशित केलेली मुलाखत खोटी आणि बनावट असल्याचे 2007 मध्ये झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटाचे आरोपी स्वामी असीमानंद यांनी म्हटले आहे. मासिकाने त्याच्या उत्तरात मुलाखतीचे ट्रांस्क्रिप्ट प्रसिद्ध केले आहे. लीना गीता रघुनाथ यांनी ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीनुसार असीमानंद यांनी मुस्लिम बहुल भागात केल्या जाणा-या स्फोटांची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि इंद्रेश कुमार यांना दिली होती. समझौता एक्स्प्रेस, अजमेर, मालेगाव आणि मक्का मस्जिद येथे झालेल्या स्फोटांमध्ये रास्व संघाच्या मोठ्या नेत्यांचा हात असल्याचीही चर्चा होती.
Caravan मासिकात असीमानंदांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर रास्व संघाच्या समर्थकांनी मासिकाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. मासिकाच्या संपादकांनी त्यांना धमकी दिली जात असल्याचे म्हटले आहे. असीमानंदांनी मुलाखत बनावट असल्याचा आरोप केला असला, तरी मासिकाने त्यांचा आरोप फेटाळून लावला आहे, आणि मुलाखत खरी असल्याचे पटवून देण्यासाठी असीमानंदांसोबतच्या चार मुलाखतींची सविस्तर माहिती प्रकाशित केली आहे.
मासिकाने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, लीना गीता रघुनाथ यांनी असीमानंद यांची पहिली भेट पंचकुला जिल्हा कोर्टात 20 डिसेंबर 2011 रोजी घेतली होती. तेव्हा पत्रकाराने स्वतःची ओळख देत मुलाखतीचा आग्रह धरला होता. पहिल्या भेटीत लीना यांना असीमानंदांशी बोलण्यासाठी केवळ पाच मिनीट मिळाले होते. दिल्लीहून पत्रकार भेटीसाठी आल्याचे ऐकून असीमानंदांनी आनंद व्यक्त केला होता, आणि त्यांनी अंबाला मध्यवर्ती कारागृहात (जिथे त्यांना ठेवण्यात आले होते) मुलाखत देईल असे सांगितले होते. त्यानंतर 10 जानेवारी 2012, 22 जून 2013, 9 जानेवारी 2014 आणि 17 जानेवारी 2014 असे चार वेळा असीमानंदांची भेट घेऊन मुलाखत घेण्यात आली होती.

पुढील स्लाइडमध्ये, असीमानंदांचा गौप्यस्फोट