आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swami Asimananda Rss Samjhauta Express Blast Latest News Marahti

स्फोटांमधील सहभागाच्या आरोपानंतर आरएसएस प्रमुख मोहन भागवतांच्या अटकेची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समझोता एक्स्प्रेस स्फोटांप्रकरणी काँग्रेसने संघ आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी, हे देशाच्या संरक्षणासंबंधातील प्रकरण असल्याचे सांगत सत्य समोर आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही असीमानंद खरेच बोलत असले पाहिजे, असे म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांनी मोहन भागवत यांना अटक करण्याची मागणी केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी या आरोपांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्याची मागणी केली आहे.
भाजप आणि संघाने सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा आरोप करीत म्हटले आहे, की निवडणूका जवळ येत असल्याने काँग्रेस अशा मुद्यांना हवा देत आहे. प्रकाश जावडेकर यांनी अशी कधी मुलाखतच झाली नसल्याचा दावा केला आहे.
काय आहे प्रकरण
2007 मध्ये समझोता एक्स्प्रेस मध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी स्वामी असिमानंद यांना अटक करण्यात आली होती. हे स्फोट घडवून आणण्यास संघ प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले असल्याचे असिमानंद यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे, की मुस्लिम भागात जेवढे स्फोट घडवून आणले त्यासाठी मोहन भागवतांनी परवानगी दिली होती. या स्फोटांना परवानगी देण्यात संघाचे वरिष्ठ पदाधिकारी इंद्रेश कुमार देखील सहभागी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), भारतीय जनता पक्ष आणि असीमानंद यांच्या वकिलाने कॅरावनने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, वाचा मुलाखतीचे दोन भाग

असीमानंद यांचा ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.