आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांचे नागरिकत्व रद्द करण्याची स्वामी यांची मागणी, पुरावेही केले सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व परत घ्यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
स्वामी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत काही दस्तऐवज दाखवले आणि राहुल यांचे दुहेरी नागरिकत्व असल्याचे सांगितले. त्यांच्या कागदपत्रानुसार, ब्रिटिश कंपनी ब्लॅकॉप्स लिमिटेडमध्ये राहुल यांची ६५ टक्के भागीदारी आहे. ही कंपनी सुरू करण्यासाठी राहुल गांधी २००३ ते २००६ दरम्यान ब्रिटनचे नागरिक झाले. आपल्या जन्मतारखेची योग्य माहिती देऊन ब्रिटनमध्ये आयकर परतावाही भरला. स्वामी यांच्या म्हणण्यानुसार, राहुल ब्रिटिश नागरिक असल्याचा हा सज्जड पुरावा असून ते कंपनीचे भागीदारही आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी या प्रकरणातील सत्य शोधले पाहिजे. त्यात तथ्य असेल तर राहुल यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे आणि संसदेतील सदस्यत्वही संपुष्टात आणावे. सर्व कागदपत्रे लंडनमध्ये राहून स्वत: मिळवली अाहेत. त्यामुळे कोणी संशय घेण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचे स्वामी म्हणाले. दरम्यान, स्वामी म्हणाले.

स्वामींचे वायफळ वक्तव्य : काँग्रेस
काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी स्वामी यांचे आरोप फेटाळले आहेत. स्वामी राष्ट्रीय राजकारणात एकटे पडले आहेत. त्यामुळे ते वायफळ वक्तव्य करून स्वत:कडे लक्ष आकर्षित करत असल्याचे माकन म्हणाले.