आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी घ्या, स्वामींनी पंतप्रधानांना विनंती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी रामजन्मभूमी जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी घेण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप करावा यासाठी साकडे घातले आहे. या प्रकरणी नियमित सुनावणी व्हावी यासाठी कायदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, जेणेकरून या वर्षअखेरपर्यंत मंदिर निर्माणाचे काम सुरू होऊ शकेल, असे स्वामी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या प्रकरणी त्यांनी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी, सपा नेते मुलायमसिंह यादव व इतर नेत्यांना भेटून या वादातून मार्ग काढण्यासाठी मध्यस्थी करण्याचीही तयारी दाखवली आहे.
पत्रकार परिषदेत डॉ. स्वामी म्हणाले की, राम मंदिराच्या मुद्द्यावर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी देशभर चर्चासत्रे आयोजित करण्यात येतील. त्यात लोकांना मंदिरासंदर्भात कायदेशीर व ऐतिहासिक पैलूंची माहिती देण्यात येईल. स्वामी यांनी ओवेसी यांच्या मताचा उल्लेख केला. याचिकाकर्ता तसेच मुस्लिम नेतेही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला देण्यात आलेल्या अाव्हान याचिकेवर नियमित सुनावणी व्हावी या मताचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. स्वामी आणि ओवेसी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचा विषय राम मंदिर हाच होता. त्या वेळी ओवेसी यांनीच डॉ. स्वामींना या प्रकरणाची नियमित सुनावणी घेण्यासाठी तुम्ही सरकारकडे प्रयत्न का करत नाही? असा प्रश्न विचारला होता.
बातम्या आणखी आहेत...