आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हर हर मोदी\'वरील नाराजी शंकराचार्यांनी कळवली RSS प्रमुखांना, भाजप कडून खंडन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाराणसीमध्ये 'हर हर महादेव'च्या गजरा प्रमाणेच 'हर हर मोदी'चा नारा घुमू लागला आहे. या घोषणेला द्वारिका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी अक्षेप घेतला आहे. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी त्यांची नाराजी थेट राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना फोन करुन कळविली आहे. हर हर मोदी या घोषणेमुळे हिंदू देवतांचा अवमान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे लवकरच बंद करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संघ प्रमुख भागवतांनीही शंकराचार्यांच्या सुरात सुर मिसळत ही घोषणा योग्य नसल्याचे म्हटले आहे. संघाशी संबंधीत सुत्रांच्या माहितीनुसार, भागवत लवकरच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याशी याबद्दल चर्चा करणार आहेत.
हिंदू देवी-देवतांचा अवमान करणारी घोषणा
स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे म्हणणे आहे, की 'हर-हर' हा नारा हर-हर महादेव, हर-हर गंगे साठी दिला जातो. कोणत्याही व्यक्तीचे नाव यासोबत जोडून हिंदूच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न होत आहे.
स्वामी स्वरुपानंद म्हणाले, 'गोळवलकरांचे विचार नवनीत या पुस्तकात आरएसएस मध्ये व्यक्ती पुजेला महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले होते. जर आरएसएसचे कार्यकर्ते एका व्यक्तीची (नरेंद्र मोदी) पुजा करीत असतील तर ते आरएसएसच्या सिद्धांच्या विरोधात आहे. हर-हर या घोषणेमुळे देवी-देवतांचा अपमान होत आहे. ' स्वामी स्वरुपानंद यांनी याआधी मोदींनाही पत्र लिहून हर-हर मोदी घोषणेवर नाराजी व्यक्त केली होती.
भाजपने केले खंडन
शंकराचार्यांनी हर-हर मोदी घोषणेवर अक्षेप घेतल्यानतंर भाजपने तातडीने प्रतिक्रीया दिली आहे. भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारमन म्हणाल्या, 'पक्षाने अशी कोणतीही घोषणा दिलेली नाही. तसेच तशा कोणत्याही घोषणेचा प्रचारासाठी वापर होत नाही. लोकांनीच ही घोषणा दिली आहे. '

पुढील स्लाइडमध्ये, मोदींच्या नावावर पत्रकाराच्या कानशिलात लगावली होती शंकराचार्यांनी