आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्माने जगाला शिकवली सहनशिलता: 124 वर्षांपूर्वी अमेरिकेत बोलले होते विवेकानंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 सप्टेंबर 1893 राेजी स्वामी विवेकानंदांनी शिकागाे येथील जागतिक धर्म परिषदेत भाषण केले. जगाला चकित करणाऱ्या अाणि भारताला जागवणाऱ्या या भाषणाच्या शतकाेत्तर राैप्यमहाेत्सवी वर्षास प्रारंभ झाला अाहे. यानिमित्त स्वामीजींच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा...
 
धर्म परिषदेतील वाद कथेने शमवला
धर्म परिषदेतील पाचव्या दिवशी 15 सप्टेंबर 1893 रोजी सर्व धर्मांचे प्रतिनिधी आपापसात वाद घालू लागले, तेव्हा विवेकानंदांनी पुढील कथा सांगून सर्वांना शांत केले. 
एकाविहिरीत अनेकदिवसांपासून एक बेडूक राहत होता. एके दिवशी समुद्रात राहणारा दुसरा बेडूक तेथे गेला आणि विहिरीत पडला. विहिरीतल्या बेडकाने विचारले, ‘तू कोठून आला आहेस? यावर तो म्हणाला, ‘मी समुद्रातून आलो आहे.’ विहिरीतला बेडूक म्हणाला, ‘समुद्र किती मोठा असतो? माझ्या विहिरीएवढा असतो का?’ असे म्हणत त्याने मोठी उडी मारली. समुद्रातील बेडूक म्हणाला, ‘अरे मित्रा, समुद्राची तुलना विहिरीशी कशी करता येईल?’ तेव्हा विहिरीतील बेडकाने आणखी एक उडी मारली आणि म्हणाला, ‘आता एवढा मोठा आहे का तुझा समुद्र?’ समुद्रातील बेडूक म्हणाले,‘तू काय मूर्खपणा चालवला आहेस. समुद्राची तुलना विहिरीशी होऊच शकत नाही.’ हे ऐकल्यावर विहिरीतला बेडूक म्हणाला, ‘जा जा. माझ्या विहिरीपेक्षा मोठे काही असूच शकत नाही. खोटारडा कुठला. अरे याला बाहेर काढा रे...’ ही एक चिरंतन चाललेली समस्या आहे. मी हिंदू आहे. मी आपल्या एवढ्याश्या विहिरीत बसून असेच समजतो की, माझी विहीर म्हणजेच संपूर्ण विश्व आहे. ख्रिश्चनदेखील आपापल्या लहानश्या विहिरीत राहून असाच विचार करतो की, हेच सर्व जग आहे. मुस्लिमांचीदेखील आपली विहीर हेच ब्रह्मांड असल्याचा विचार करतो. 
 
अमेरिकेतील माध्यमांनी घेतलेली दखल 
 
डेट्रॉइट ट्रिब्यून 
१८फेब्रुवारी १८९४

ज्ञानी हिंदूसंन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या कालच्या भाषणामुळे डेट्रॉइटमध्ये आजपर्यंत एवढी सांस्कृतिक घुसळण कधीही झाली नव्हती, ती पाहावयास मिळाली. आमच्या भाषेवरचे प्रभुत्व दाखवत त्यांनी पौर्वात्य जगाचा दृष्टिकोन आमच्यापुढे ठेवला. या भाषणात विवेकानंद म्हणाले, ‘माझे मिशन उपस्थितांना शिक्षण देण्याचे नसून भारतात येऊन तेथे शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे एखादे महाविद्यालय सुरू करावे, असे आहे. येथे प्रशिक्षित झालेले शिक्षिक पुढे जनतेत जाऊन त्यांच्यामधील वाईट प्रवृत्तींना दूर करतील’. मिशनऱ्यांना भारतात पाठवण्यापेक्षा अमेरिकेतील शिक्षकांना तेथे पाठवून त्यांच्याकडून औद्योिगक शिक्षणाचा प्रसार व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले. 
 
डेली कार्डिनेल 
२१नोव्हेंबर १८९३
-
विवेकानंद यांचे व्याख्यान ज्यांनी ऐकले असेल त्यांना ते नक्कीच प्रेरणादायी वाटले असेल. सावळा हसरा चेहरा आणि त्यात वर्तन अत्यंत प्रभावशाली दिसत होते. आवाजातील माधुर्य मार्दवता इतकी रहस्यमय वाटत होती की भाषणाच्या सुरुवातीपासून त्यांनी श्रोत्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. हत्ती अंध माणसाची एक गोष्ट त्यांनी सांगितली धर्माचे नेमके स्वरूप उपस्थितांसमोर विशद केले. अंध मनुष्य जसा हत्तीला स्पर्श करून आपले मत सांगत असतो तसे प्रत्येक धर्मात पंथात सत्याचा अंश असल्याचे त्यांनी सांगितले. सत्य हे अनंत आहे, त्यामुळे कोणतीही व्यक्ती असा दावा करू शकत नाही की त्याला या जगाचे ज्ञान आहे त्याला सर्व माहिती आहे! 
 
न्यू यॉर्क क्रिटिक 
११नोव्हेंबर १८९३
 
ब्राह्मण्य सोडूनविवेकानंदांनी संन्यासत्व स्वीकारले, त्याची छाप त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पूर्णपणे पडल्याचे दिसून आले. त्यांची संस्कृती, वाक्चातुर्य आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे आपल्याला हिंदू संस्कृतीबद्दल नव्याने विचार करायला मिळाला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रोचक असे आहे. पिवळ्या भगव्या वस्त्रांमुळे त्यांचा चेहरा अधिक तजेलदार, बुद्धिमान दिसत होता. त्यांची वाणी संगीतमय वाटत होती. अत्यंत हुशारीने ते ज्ञान निष्कर्ष श्रोत्यांपुढे ठेवताना िदसत होते. त्यांच्या भाषणात वक्तृत्वकलेची उत्तुंगता दिसून येत होती. 
 
सालेम इव्हनिंग न्यूज 
२९ऑगस्ट १८९३
-
काल संध्याकाळी वेस्ली येथील एका प्रार्थनास्थळी ‘धर्मसंसद’चे अनेक सदस्य स्वामी विवेकानंद यांना भेटण्यासाठी जमले होते. विवेकानंद हे या ठिकाणी वेद अन्य हिंदू ग्रंथांबाबत आपले मत व्यक्त करणार होते. आपल्या भाषणात विवेकानंद यांनी जातिव्यवस्था ही समाजाचे विभाजन करणारी बाब असून ती धर्मावर आधारित नसल्याचे सांगत भारतातील जनतेला श्रेष्ठ धर्माची नव्हे तर व्यावहारिकपणाची अधिक गरज असल्याचे मत व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...