आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामींची तक्रार गृह खात्याकडे पाठवली, राष्ट्रपती सचिवालयाची कार्यवाही, केजरींवर आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजप नेते आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारभारावर टीका केली आहे. ते मनमानीने सरकार चालवतात, असा आरोप स्वामींनी केला. त्यांनी यासंबंधी राष्ट्रपतींना पत्र लिहिले. राष्ट्रपती सचिवालयाने हे पत्र गृह मंत्रालयाला पाठवले आहे.

गेल्या आठवड्यात स्वामींनी हे पत्र लिहिले होते. आप सरकार मनमानी करत आहे. अयोग्य आणि नकारात्मक पद्धतीने दिल्ली सरकारचा कारभार सुरू आहे. स्वामींनी उपराज्यपाल नजीब जंग यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने चिथावल्याने नजीब जंग केजरीवालांवर टीका करतात. आप नेत्यांच्या कारभाराविषयी आपण साशंक असल्याचे स्वामींनी या पत्रात नमूद केले. भाजप खासदार महेश गिरीवर खुनाचा आरोप लावल्यासंदर्भातही यात उल्लेख आहे. दरम्यान, स्वामींनी याअगोदर काँग्रेस अध्यक्षांसह जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर आरोप न्यायालयीन संघर्ष केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतर एक दिवसातच स्वामींना ‘गीतासार’ आठवले आहे. त्यांनी ट्विट केले, ‘जग आपल्या सामान्य संतुलनाच्या अवस्थेत असते. एखाद्या टोकाला काही बदल झालेच तर त्याचे परिणाम सर्वत्र दिसून येतात. श्रीकृष्णाने सल्ला दिला आहे: सुख-दु:ख, विजय-पराभव या सर्व स्थितीत स्वत:ला स्थिर राखून युद्ध करा. त्यामुळे तुमच्याकडून पाप घडणार नाही. पंतप्रधान मोदींनी स्वामींचा नामोल्लेख करता सोमवारी त्यांची वक्तव्ये म्हणजे ‘पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...