आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीव गांधींनीही केले होते राम मंदिराचे समर्थन; स्वामींचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना एनएसयूआय आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी केलेल्या तीव्र आंदोलनाचा विरोध डावलून दिल्ली विद्यापीठात शनिवारी कडेकोट बंदोबस्तात राम मंदिर जन्मभूमीवर चर्चासत्र सुरू झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद््घाटन झाले. या वेळी त्यांनी दावा केला की, मंदिर तर होणारच, परंतु कायद्याच्या विरूद्ध बळजबरी, दबाव टाकून नव्हे. याबाबतचा खटला आम्ही न्यायालयात जिंकू, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे,

चर्चा सत्राच्या उद््घाटन सत्रात स्वामी म्हणाले, "माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही व्यक्तिगत पातळीवर बोलताना मला म्हणाले होते की, राम मंदिर झाले पाहिजे. पक्षाने विरोध केलेला असतानाही त्यांनी बाबरी मशिदीचे दरवाजे उघडले. १९८९ मध्ये प्रचारात ते म्हणत असत की, देशात रामराज्य येईल. मला विश्वास आहे की काँग्रेस या मागणीचे समर्थन करेल. कारण ही केवळ आमची नाही तर ती देशाची मागणी आहे. '

याआधी स्वामी यांनी म्हटले होते की, अयोध्येत मुस्लिम समुदायाच्या सहकार्याने या वर्षाखेरीपर्यंत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल.

राम मंदिर झाल्यास इतर मंदिरांचा मार्ग मोकळा
स्वामी म्हणाले, "आपल्या देशात ४० हजारांपेक्षा जास्त मंदिरे नष्ट करण्यात आली. त्या सर्व ठिकाणी मंदिरे उभारावीत, असे आम्ही कधीही म्हटलेले नाही; परंतु तीन मंदिरांबाबत कसलीही तडजोड होऊ शकत नाही. राम जन्मभूमी, मथुरेतील कृष्ण मंदिर काशी विश्वनाथ मंदिर. जर राम मंदिर तयार झाले तर इतर मंदिरांचा मार्गही मोकळा होईल. चर्चा केली जाऊ शकते. परंतु समझोता नाही.'

एनएसयूआय, डाव्या संघटनांकडून विरोध
या चर्चा सत्राला विरोध करत एनएसयूआय डाव्या विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ परिसरात तीव्र निर्दशने केली. प्रचंड बंदोबस्त तैनात होता विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा सौम्य वापर करावा लागला. "हे चर्चासत्र कुणाच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचवण्यासाठी घेतलेले नाही. तर संवेदनशील मुद्द्यावर शास्त्रीय तर्कसंगत समीक्षा व्हावी या उद्देशाने ते घेण्यात आले आहे, असे डॉ. स्वामी यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...