आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामींनी नाव न घेता दिले मोदींना उत्तर- \'मी नाही तर प्रसिद्धी माझ्या मागे लागली\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वामींनी गेल्या आठवड्यात केंद्र सरकार आणि अर्थमंत्री जेटलींविरोधात मोर्चा उघडला होता. - Divya Marathi
स्वामींनी गेल्या आठवड्यात केंद्र सरकार आणि अर्थमंत्री जेटलींविरोधात मोर्चा उघडला होता.
नवी दिल्ली - भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या वक्तव्याने पक्षासमोरच अडचणी निर्माण केल्याने मोदींनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी होणारी वक्तव्ये नेत्यांनी टाळावी, असा सल्ला दिला होता. त्यानंतर खासदार सुब्रमण्यम स्वामींनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. स्वामी म्हणाले, 'प्रसिद्धीच माझ्या मागे लागली आहे, मी तरी काय करणार.'

स्वामी म्हणाले, 'माझी अडचण वेगळीच आहे. प्रसिद्धीच माझ्या मागे लागली आहे.'
- '30 ओबी व्हॅन घराबाहेर उभ्या आहेत. चॅनल्सकडून 200 मिस्ड कॉल येऊन जातात.'

काय म्हणाले होते पंतप्रधान
> स्वामींनी गेल्या काही दिवसांपासून आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि वित्त सचिव शक्तीकांत दास यांच्याविरोधात ट्विटरवर मोर्चा उघडला होता.
- स्वामींच्या या वक्तव्याने पक्षाला बॅकफूटवर जावे लागले. स्वामी जे म्हणतात ते पक्षाचे अधिकृत मत नसून ते स्वामींचे वैयक्तिक विचार असल्याचे वारंवार सांगावे लागले.
- स्वामींनी केवळ गव्हर्नर, आर्थिक सचिव आणि वित्त सचिवांनाच टार्गेट केले नाही, तर ते केंद्रीय अर्थमंत्र्यांवरही घसरले होते.
- दरम्यान, एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मोदींना स्वामींवरुन थेट सवाल विचारण्यात आला होता. त्यावर मोदी म्हणाले होते, 'ही प्रसिद्धीची जी हाव आहे, त्याने कधीही देशाचे भले झालेले नाही. कोणीही स्वतःला व्यवस्थेपेक्षा मोठे समजू नये. हे चूक आहे. (आरबीआय गव्हर्नर) राजन हे कोणत्याही देशभक्तापेक्षा कमी नाहीत.'
#1 - जेटलींना काय म्हणाले होते स्वामी
कोट, टायमध्ये वेटर : स्वामींनी वृत्तपत्रातील एका छायाचित्रावरून शुक्रवारी जेटलींवर टीका केली होती. बीजिंगमध्ये बँक ऑफ चायनाच्या बैठकीत जेटलींनी हजेरी लावल्याचे छायाचित्र शुक्रवारच्या अंकात झळकले होते. त्यावर स्वामींनी तिरकस प्रतिक्रिया दिली. परदेशात वावरताना मंत्र्यांनी पारंपरिक किंवा आधुनिक भारतीय कपडे परिधान करून जायला हवे. काही मंत्री कोट व टायमध्ये वेटरसारखे दिसू लागतात, असा टोला त्यांनी लगावला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ट्विटमधूनच दिले मोदींना उत्तर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...