आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर सत्रात संसद, विधिमंडळांत एक दिवस महिलांच्याच मुद्द्यांवर चर्चेचा नियम करावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वाती मालीवाल यांनी सोमवारी दिल्लीच्या महिला आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले. त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा असल्या तरी आपले म्हणणे देशातील प्रत्येक महिला, प्रत्येक सरकारपर्यंत पोहोचवू इच्छितात. पदभार घेताच त्यांनी पहिली मुलाखत दिव्य मराठी नेटवर्कला दिली. महिलांबाबत मोदी सरकारचे धोरण, केजरीवालांशी नाते, आपल्याच पक्षाच्या कुमार विश्वास, सोमनाथ भारतींच्या मुद्द्यावर त्या बरेच काही बोलल्या.यात काही वादे केले तर काही दावे. इरादे मात्र, प्रत्येक उत्तरात सांगितले. स्वाती मालीवाल यांच्याशी दिव्य मराठी नेटवर्कच्या अमित मिश्रा यांच्या चर्चेतील मुख्य मुद्दे...

प्रश्न : तुमचेच नेते सोमनाथ व कुमार विश्वास यांच्यावर आरोप आहे, सामना कसा कराल?
भारती असो वा विश्वास, मी येथे कुणाची वकिली नव्हे तर महिलांना न्याय देण्यासाठी आले आहे. महिलेचा संसार मोडू नये, हा माझा पहिला प्रयत्न असेल. कोणत्याही किमतीवर मी महिला आयोगाला राजकीय आखाडा बनू देणार नाही.

सर्वच पक्ष महिला सुरक्षेचे दावे करतात, तुमचा काय दावा?
फक्त दावे नाही, इरादे सांगते. महिला सुरक्षेसाठी मी एक्स्पर्ट समिती स्थापत आहे. त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा समावेश असेल. या समितीच्या ब्ल्यू प्रिंटच्या आधारे महिला आयोग काम करेल.

पीएम मोदी महिलांसाठी जे करत आहेत, ते पुरेसे आहे का?
आश्वासने देण्याशिवाय काय करत आहेत? भररस्त्यावर मुलीला ३४ वेळा भोसकले जाते, ही कसली सुरक्षा? संसदेत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होते, महिला सुरक्षा वगळता. का? मी पीएम, सर्व सीएम, लोकसभा, राज्यसभा व राज्यांच्या विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांना पत्र पाठवतेय. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात एक दिवस फक्त महिला सुरक्षा व त्यांच्या मुद्द्यांवरच चर्चा व्हावी, असा नियम तयार करण्याची विनंती करेन.

सुरक्षा तर कायद्याशी निगडित आहे, चर्चेने काय होईल?
नक्कीच होईल. महिला आयोग बंद खोल्यांत राहत असल्याने सध्या चर्चा होत नाही. आम्ही चौकटी मोडू. प्रत्येक पातळीवर समन्वय वाढवू. आम्हाला फक्त काही अधिकार द्या अन् परिणाम अनुभवा.

असे म्हटले जाते की, केजरींसोबतच्या नातेसंबंधामुळे तुम्ही येथे पाेहोचल्या?
मी अरविंदजींची नातलग नाही. २००७ मध्ये त्यांना पहिल्यांदा भेटले. २००६ मध्ये संतोष कोलींना भेटले व नंतर सामाजिक कार्यांशी जुळले. अण्णा हजारेंच्या कोअर टीममधील मी सर्वात लहान सदस्य होते. महिलांसाठी खूप कार्ये केल्यानेच मी इथवर पोहोचले. उर्वरित. पान १२
दिल्लीमध्ये जे काही होत आहे त्यासाठी कोण जबाबदार आहे?
शंभर टक्के केंद्र सरकार. कारण कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे दिल्ली पोलिस व केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे त्याची जबाबदारीदेखील त्यांनीच घेतली पाहिजे.

आता दिल्लीमधे एखादी मोठी घटना घडली तर काय करणार?
आजनंतर कोणत्याही महिलेसोबत दिल्लीमध्ये एखादी मोठी घटना घडली तर त्याची सूचना मला मिळते. मी त्या पीडितेची पहिल्यांदा जाऊन भेट घेईन. त्यासाठी जिथवर जायचे असेल तिथवर जाईन. धरणे, आंदोलन, कोर्ट- कचेरी या सर्व गोष्टी पीडित महिलेसाठी मी करेन.जेणेकरून दुसऱ्या महिलांपर्यंत हा संदेश जाईल की महिला आयोग आता त्यांच्यासाठी ठोस काम करत आहे.

तुम्ही प्राथमिकता कशाला देणार आहात?
सर्वात पहिले प्राधान्य वेश्याव्यवसाय रोखण्याला देणार आहे. दिल्लीच्या मधोमध जीबी रोडवर खुलेआम वेश्या व्यवसाय चालतो. महिलांचे शोषण होत आहे. आतापर्यंत त्याविरोधात कुठल्याचठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत मी त्यादृष्टीने काम करणार आहे. रस्त्यावर झोपणाऱ्या महिलांसाठी मुलभूत सुविधा देणे, तिहार कारगृहात अनेक महिला अशा आहेत की ज्यांची शिक्षा संपली आहे. परंतु त्या अजूनही तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठीही मी प्रयत्न करणार आहे. दारू व दारुडे यांच्याविरोधातही मोहीम सुरू करणार आहे. जर एखाद्या महिलेने असे लिहून दिले की, त्यांच्या भागात दारूचा गुत्ता सुरू आहे व त्यामुळे अडचणी येत आहेत. तर तो गुत्ता बंद केला जाईल. २४x७ महिलांसाठी हेल्पलाइलन सुरू करण्यात येईल. त्याठिकाणी महिलांशी संबंधित प्रत्येक प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन. महिलांसाठी सेवाभावी कृतीगट तयार केले जातील. जे समाजासोबत मिळून काम करतील.
बातम्या आणखी आहेत...