आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूचा कहर; ४३ दिवसांत ४८५ जण दगावले, ६ हजार २९८ बाधित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वाइन फ्लूने हळूहळू संपूर्ण देशात पाय पसरायला सुरुवात केली आहे. या वर्षी १ जानेवारीपासून १२ फेब्रुवारीपर्यंत दररोज सरासरी १२ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार १२ फेब्रुवारीपर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु जसजशी उष्णता वाढू लागेल, तसे स्वाइन फ्लूचे प्रमाण कमी होत जाईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

२०११ पासून स्वाइन फ्लूच्या केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०११ मध्ये स्वाइन फ्लूची ६०३ प्रकरणे समोर आली होती. यातील ७५ जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी १२ फेब्रुवारीपर्यंत ६ हजार २९८ प्रकरणे समोर आली आहेत. पैकी ४८५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यांना केंद्राकडून अतिरिक्त औषधी आणि निदान किट पुरवण्यात येत आहेत. राज्य सरकारांना स्वाइन फ्लूच्या लक्षणांबाबत अधिकाधिक जागरूक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशय वाटल्यास रुग्णालयात तत्काळ तपास करण्याची व्यवस्थाही आहे.

पुढे वाचा... ६२ जण पॉझिटिव्ह