आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लू : पहिल्या दीड महिन्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक रुग्णांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांमध्ये स्वाइन फ्लूने पाय पसरले आहेत. यावर्षी पहिल्या 50 दिवसांमध्येच स्वाइन फ्लूने 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच 2014 मध्ये झालेल्या मृत्यूच्या तुलनेत दुपटीहून अधिक मृत्यू या वर्षाच्या सुरुवातीलाच झाले आहेत. तसेच या आजाराने गस्त असलेल्या रुग्णांची संख्या तर गेल्या दोन वर्षांच्या एकूण रुग्णांपेक्षाही जास्त असल्याचे समोर आले आहे.

कोणत्या वर्षी किती रुग्ण आढळले ?
वर्ष आढळलेले रुग्ण मृत्यू
2015 8423 585
2014 937 218
2013 5253 699
2012 5044 405
2011 603 75
2010 20604 1763
2009 27236 981
अचानक कसा वाढला प्रभाव ?
वातावरणामुळे याचा प्रभाव वाढला आहे. थंडी अधिक काळ राहिली आहे. त्यात लोकांमध्ये जागरुकतेचे प्रमाणही कमी आहे. लोक लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच रुगण मनानेच अँटीबायोटिक्स घेत असल्याचीही माहिती मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा बॉडी रेझिस्टंस स्टेंस कमी होत आहे. त्यात लोकांमध्ये सेकंडरी इन्फेक्शनचा धोका वाढत आहे. उन्हाळा वाढताच याचा प्रभाव कमी होणार असल्याची चिन्हे आहेत.

लसीची परिणामकारकता कमी झाली ?
नाही, कारण पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरलॉजी आणि दिल्लीच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या नुकत्याच आलेल्या एका अङवालात एच1एन1 इन्फ्लुएंजाचे स्वरुप 2009 सारखेच असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच हा पूर्वीपेक्षा घातक नाही. त्यामुळे तीच लक्ष अधिक परिणामकारक असणार आहे. पण दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नवी लस येत असते. स्वाइन फ्लू प्रतिकारक क्षमता तयार करण्यात या लसीला 4 आठवडे लागतात. त्यामुळे ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यातच लोकांनी लस घेणे गरजेचे आहे. भारतात स्वाइन फ्लूसाठी 45 प्रकारच्या लसी मिळतात.

देशात खरंच स्वाइन फ्लूच्या औषधांची कमतरता आहे का?
नाही, केंद्र सरकारकडे 60 हजार Oseltamivir चे डोस उपलब्ध आहेत. पीडिअॅट्रिक सिरपचे एक हजार डोस आहेत. पण तपास करणाऱ्यांसाठी 10 हजार मास्क आणि 10 हजार डिटेक्शन किट आहेत. स्वाइन फ्लूच्या औषधांचा रुग्णालयांत पुरवठा होण्यात अडचणी मात्र आहेत. तसेच सर्वच मेडिकल स्टोरवरही हे औषध मिळत नाही. उदाहरणादाखल मुंबईत 7 हजार केमिस्ट आहेत. पण केवळ 100 स्टोरर्सनाच औषध विक्रीचा परवाना आहे.

ओव्हर द काऊंटर औषध मिळते?
नाही, रुग्ण आपल्या मर्जीने हे औषध घेऊ शकत नाहीत. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन गरजेचे आहे. प्रिस्क्रिप्शन दाखवूनच ते खरेदी करता येऊ शकते. IMA च्या मते त्या रुग्णांना स्वाइन फ्लूची लागन झालेली नसेल त्यांनी टॅमी फ्लूसारखे औषध घेता कामा नये.