आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swiss Banks Seek Fresh Undertakings From Indians

काळा पैसा रोखण्यासाठी आता भारतीय खातेदारांकडून स्विस बँका घेणार शपथपत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काळ्या पैशाबाबतची आपली प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी स्विस बँकांनी भारतीय खातेधारकांकडून शपथपत्रांची मागणी केली आहे.यथायोग्य कर भरणा करूनच संबंधित रक्कम आपल्या बँकेत जमा करण्यात आल्याची खात्री पटवण्यासाठी या बँकांनी हे पाऊल उचलले आहे.
मात्र, यासाठी या बँकांवर विविध देशांतील सरकारचा दबाव असल्याचे मानले जाते.
बेकायदेशीरीत्या गोळा केलेला पैसा सुरक्षित ठेवण्याचे माहेर म्हणून स्विस बँकांची ओळख आहे. त्यामुळे या बँकांनीही अधिक संपत्तीमूल्य असलेल्या व्यक्ती तसेच औद्योगिक ग्राहकांकडून शपथपत्रांची मागणी केली आहे. परदेशातील बँकांमध्ये भारतीयांनी लपवून ठेवलेला काळा पैसा देशात परत आणण्यासाठी भारत सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र सरकारने स्वित्झर्लंडवर दबाव तयार केला आहे. त्यामुळे स्विस सरकारनेही भारतास सहकार्य करण्यास सहमती दर्शवली आहे. फ्रान्स सरकारकडून काळ्या पैशाच्या यादीतील भारतीयांची नावे प्राप्त झाल्यानंतर भारताने हे प्रकरण उचलून धरले आहे.
एचएसबीसीच्या यादीत ६२८ नावे
एचएसबीसी बँकेच्या काळ्या पैशाच्या यादीतील व्यक्तींवर कारवाई करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. एचएसबीसीने अशा प्रकारच्या ६२८ लोकांची यादी जाहीर केली असून त्यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.