आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swiss Private Bank HSBC Indian List Just Doubled To 1195 Names. Balance: Rs 25420 Cr

Black Money: स्वित्झर्लंडच्या बॅंकेत ठाकरे, राणे, साठे, अंबानींचे कोट्यवधी रुपये, वाचा यादी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा असलेल्या 60 खातेधारकांची नावे केंद्र सरकार आज (सोमवारी) जाहीर करण्याची शक्यता आहे. परंतु, त्याआधीच स्वित्झर्लंडमधील 'एचएसबीसी' या खासगी बॅंकेतील 1195 भारतीय खातेदारांची माहिती उघडकीस आली आहेत.

इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्सप्रेस'ने भारतीय खातेदारांची यादी जाहीर केली आहे. यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य, कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि अंबानी कुटुंबियांची नावे आहेत. धक्कादायक म्हणजे भारतीय खातेदारांच्या नावे तब्बल 25 हजार 420 कोटी रुपयांची 'काळी' माया असल्याचे उघडकीस आले आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांचे या बॅंकेत खाते आहेत. या शिवाय बिझनेस टायकून नरेश गोयल, यशोवर्धन बिर्ला, राजन नंदा, अनूप मेहता, सौनक पारिख आदी उद्योगपतींचेही खाते असल्याचे समजते.

'एचएसबीसी'ने जाहीर केलेल्या यादीत भारतातील उद्योग आणि राजकारणातील बड्या नेत्यांची नावे आहेत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची सून स्मिता ठाकरे, कॉंग्रेस नेते नारायण राणे यांची पत्नी निलिमा राणे आणि मुलगा निलेश राणे, कॉंग्रेसचे माजी नेते वसंत साठे यांचे कुटुंब यांचीही नावे आहेत. 'एचएसबीसी'ने गौप्यस्फोटाला 'स्विसलिक' असे शिर्षक दिले असून ही नावे 2006-07 मधील दस्ताऐवजातील आहेत.
यापूर्वी 2011 मध्ये फ्रेंच अॅथॉरिटीने भारत सरकारला 'एचएसबीसी बॅंकमधील 628 भारतीय खातेदारांची नावे दिली होती. मात्र, आता एचएसबीसी बॅंकेत 1,195 भारतीयांचे खाते असल्याची माहिती उघड झाली आहे. या नव्या यादीत देशातील उद्योगपतींसह अनेक राजकारण्यांची नावे आहेत.
अशी आहे खातेधारकांची यादी
इंडियन एक्‍सप्रेसमध्ये आलेले खातेधारकाचे नावखात्यात जमा असलेली रक्कम (एक डॉलर=62 रुपयांनुसार )व्यवसायवृत्तपत्राने घेतलेली प्रतिक्रिया
मुकेश अंबानी164.92 कोटी रुपयेरिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमनअकाऊंट अधिकृत आहे.
अनिल अंबानी164.92 कोटी रुपयेरिलायन्स टेलीकॉमचे चेअरमनऑफिसने सांगितले, एचएसबीसीमध्ये ओवरसिज अकाऊंट नाही.
नरेश कुमार गोयल116 कोटी रुपये.जेट एयरवेजचे चेअरमनप्रवक्त्याने सांगितले, की गोयल एनआरआय आहेत. कोणत्याही देशात अकाऊंट ठेवू शकतात.
बर्मन कुटुंब77.5 कोटी रुपयेया कुटुंबाकडे डाबर कंपनी आहे.आनंद राज बर्मन यांनी सांगितले, की 1999 पासून एनआयआर असून ब्रिटनमध्ये टॅक्सपेअर आहे.
अनुराग डालमिया59.5 कोटी रुपयेडालमिया ब्रदर्सप्रतिक्रिया मिळाली नाही.
स्मिता ठाकरे
(बाळासाहेब ठाकरे यांची सून.)
64 लाख रुपये.फिल्म प्रोड्यूसरमुलाच्या लग्नात व्यस्त असल्याने प्रतिक्रिया दिली नाही.
परनीत कौर
(पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टर अमरिंदरसिंग यांची पत्नी)
रक्कम समजलेली नाही.संपुआ नेते आणि केंद्रात मंत्री राहिलेल्या आहेत.कोणत्याही विदेशी बॅंकेत माझे अकाऊंट नाही.
राजन प्रसाद नंदा
(यांची पत्नी रितू नंदा दिवंगत बॉलिवूड अॅक्टर राज कपूर यांची मुलगी आहे.)
रकमेचा खुलासा नाहीएस्कॉर्ट ग्रुपचे चेअरमनमला 9 महिन्यांपूर्वी नोटीस मिळाली होती. मी त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे भूमिका मांडली आहे.
नीलम आणि नीलेश नारायण राणेरकमेचा खुलासा नाही.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची पत्नी आणि मुलगा.नीलेश म्हणाले, की मला अशा कोणत्याही खात्याची माहिती नाही.
यशोवर्धन बिर्लारकमेचा खुलासा नाही.यश बिर्ला ग्रुपचे चेअरमनकंपनीच्या सीएमचे म्हणणे आहे, की त्यांनी सगळे व्यवहार भारतीय कायद्यांप्रमाणे केले आहेत.
रितू (महिमा) चौधरीरकमेचा खुलासा नाहीलिस्टमधील एकमेव अॅक्ट्रेस आणि मॉडेल.महिमाने सांगितले, ‘मला हे प्रकरण माहित नाही. मला प्रतिक्रिया द्यायची नाही.’
मनुभाई छाबडि़या कुटुंब874 कोटी रुपयेया कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत.मुलगी किरण वजीरने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
महेश टीकमदास थारानी251.7 कोटी रुपये.होम डेकोरेशन साहित्याचे व्यापारीप्रतिक्रिया मिळाली नाही.
अनू टंडन35.8 कोटी रुपयेउन्नाव येथून कॉंग्रेस खासदार राहिल्या आहेत.‘दिवंगत पती खाते उघडले असेल तर कल्पना नाही.’
संदीप टंडन166.1 कोटी रुपये.इंडियन रेव्हेन्यूचे माजी अधिकाारी. नंतर रिलायन्ससोबत जुळले.2010 मध्ये मृत्यू झाला. अनू टंडन यांचे पती.
श्रवण गुप्ता आणि शिल्पी गुप्ता209.56 कोटी रुपये.रियल एस्टेट कंपनी ‘एम्मार’ चे चेअरमन.प्रतिक्रिया मिळाली नाही.
कुमार वेणू रमन18.97 कोटी रुपये.माजी आयआरएस अधिकारी नंतर एस्सार ग्रुपमध्ये काम केले.‘20 वर्षांपासून एनआयआर आहे, माझ्या अधिकाऱ्यांनी टॅक्स अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.’
एस.एम. नंदा, सुरेश नंदा14.2 कोटी रुपये1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी एस.एम. नंदा नौदल प्रमुख होते. सुरेश नंदा त्यांचा मुलगा.सुरेश नंदा म्हणाले, ‘1987 पासून एनआरआय आहे. मी आय़टीला सगळी माहिती दिली आहे.’
भद्रश्याम कोठारी कुटुंब. पत्नी नैना धीरूभाई अंबानी यांची मुलगी.195.6 कोटी रुपये.कोठारी ग्रुपचे चेअरमन.प्रतिक्रिया मिळाली नाही.
मो. हसीब शॉ13.2 कोटी रुपये.कश्मीरी कार्पेट आणि पश्मीना शॉल्सचे निर्यातदार.प्रतिक्रिया मिळाली नाही.
धरमवीर तनेजा10.8 कोटी रुपये.निवृत्त बॅंकरकुटुंबाने सांगितले, ‘आम्ही आरबीआयला विदेशी बॅंक खात्यांची माहिती दिली आहे.’
अालोक भारतिया8.37 कोटी रुपयेप्रसिद्ध बिझनेसमनप्रतिक्रिया मिळाली नाही.
विश्वनाथ गरोदिया6.6 कोटी रुपयेमंगल स्टील्सचे चेअरमन.‘आम्ही आयटी अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे.’
कुलदीप सिंह धींगरा, गुरबचन सिंह धींगरा25.6 कोटी रुपयेबर्जर पेंट्सचे मालक.‘आरबीआय आणि आईटीला माहिती दिलेली आहे. ’

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, एचएसबीसी बॅकेत 200 देशांच्या खातेदारांची जवळपास 62 लाख कोटी रुपयांपेक्षा (100 बिलियन डॉलर्स) जास्त 'काळी' माया...