आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस बँकेतील खात्यांची माहिती भारताला मिळणार, ब्लॅकमनीवर सरकारचे मोठे यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारला ब्लॅकमनी प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. स्वित्झर्लंड सरकारने त्यांच्या देशातील अकाऊंट्सची माहिती भारताला शेअर करण्यास मंजूरी दिली आहे. वित्तीय खाते, काळ्या पैशासंबंधित माहितीची आदान-प्रदान करण्याच्या कराराला स्वित्झर्लंड सरकारने मंजूरी दिली आहे.  भारतासह 40 देशांसोबत स्वित्झर्लंड सरकार बँक खात्यांच्या माहितीची आदान-प्रदान करणार आहे. यातून संशयास्पद ब्लॅकमनीची माहिती तत्काळ मिळू शकणार आहे. मात्र स्वित्झर्लंड सरकारने म्हटले आहे की या प्रकरणात भारत आणि दुसऱ्या देशांना गोपनियता आणि डाटा सेक्यूरिटीचे पालन करावे लागणार आहे. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान ऑटोमॅटिक इन्फर्मेंशन शेअरिंग 2019 पासून लागू होणार आहे. या करारामुळे स्विस बँकात दडवून ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणण्यास मदत होणार आहे. 
स्वित्झर्लंड फेडरल कौन्सिलने म्हटले आहे, की सरकार 2018 पासून माहितीची  आदान-प्रदान अंमलात आणणार आहे. भारताला ही आकडेवरी 2019 पर्यंत मिळू शकेल. 
 
मोदी सरकारचे मोठे यश 
- भारत आणि स्वित्झर्लंड या उभय देशांदरम्यान यामुद्द्यावर बऱ्याच काळापासून बातचीत सुरु होती. 
- मोदी सरकारची हे मोठे यश मानले जात आहे. 
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मुद्दा जी20 आणि ओईसीडी व इतरही अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसमोर उपस्थित केला होता. 
बातम्या आणखी आहेत...