आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाची खाद्यान्न, आैषधी मदतीची मागणी, भारत देणार १० लाख डॉलर्सची आैषधे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सिरियाचे उपपंतप्रधान वालिद अल मुआलेम यांनी म्हटले आहे की, मोसूलहून अपहरण झालेल्या ३९ भारतीयांच्या सुटकेसाठी सिरिया मदत करेल. हे भारतीय इराकी सेनेच्या ताब्यात असतील, तर सिरिया यासाठी निश्चितच मदत करेल, असे वालिद म्हणाले. जून २०१४ मध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी यांचे अपहरण केले होते. ते भारतीय दहशतवाद्यांच्या ताब्यात असतील, तर मात्र सिरिया मदत करू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुआलेम सध्या तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी सिरियातदेखील काही भारतीय तरुणांना अटक करण्यात आली होती. हे चार तरुण जॉर्डनच्या सीमामार्गाने सिरियात आल्याचे मुआलेम यांनी सांगितले. त्यांना आयसिसमध्ये प्रवेश करायचा होता.

साडेतीन वर्षांपासून आयसिसकडून त्रास सहन करणाऱ्या सिरियाने भारताकडून खाद्यान्न आणि आैषधींची मदत मागितली आहे. सिरियावर अमेरिका, पाश्चात्य देशांनी प्रतिबंध घातले. मुआलेम यांनी भारताकडून पुनर्निर्माणासाठी साहाय्य मागितले आहे. मुआलेम यांनी सिरियाच्या स्थितीविषयी पत्रपरिषदेत सांगितले.

१० लाख डॉलर्सची आैषधी : सुषमा स्वराज
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी सिरियाच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक पार पडली. यात मानवीय मदत भारताने द्यावी, अशी मागणी सिरियाने केली आहे. तांदूळ व आैषधींची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. मुआलेम हे सिरियाचे परराष्ट्रमंत्रीही आहेत. भारतात येण्यापूर्वी त्यांनी रशिया व चीनलाही भेट दिली होती. त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाळ यांच्याशीही चर्चा केली. संरक्षण व गुप्त माहितीच्या आदानप्रदानाविषयी ही चर्चा होती. भारत सिरियाला १० लाख डॉलर्सच्या आैषधींची मदत करणार असल्याचे स्वराज यांनी सांगितले.