आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तंबाखू उत्पादन बंदीसाठी कायदे बदलण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तंबाखू उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी सध्या सरकारकडे अधिकारच नसल्याचे यासंबंधी नेमण्यात आलेल्या विशेष समितीचे म्हणणे आहे. यासाठी सरकारला सिगारेट व तंबाखू उत्पादन कायद्यात (२००३) दुरुस्ती करावी लागेल, अशी शिफारस समितीने केली आहे. यानंतर लगेच आरोग्य मंत्रालयाने या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले.

दिल्लीचे माजी मुख्य सचिव रमेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अहवाल आरोग्य मंत्रालयाकडे सादर केला होता. हानिकारक तंबाखू उत्पादन विक्रीवर बंदीपासून सध्या देण्यात येत असलेल्या इशा-याच्या धोरणांतही सरकार बदल करू शकेल. २०१२ मध्ये काही राज्यांनी गुटख्यावर बंदी घातली होती. मात्र, अन्नसुरक्षा प्राधिकरणाच्या एका कायद्यानुसार हे शक्य झाले होते.