आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taj Group Of Hotels Wins Battle Over Trademark Of Its Spa

ताज समूहाने जिंकली ट्रेडमार्कची लढाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सने आपल्या स्पा सेवेसाठी वापरला जाणारा 'JIVA' ट्रेडमार्कचा न्यायालयीन लढा जिंकला आहे. न्या. सचदेवा यांनी अश्वजित गर्ग यांना जिवाशी साधर्म्य 'ZIVA' ट्रेडमार्क वापरण्यास मज्जाव केला आहे. गर्ग या ट्रेडमार्कच्या माध्यमातून स्पा सेवा देत होते. प्रतिवादीने झिवा ट्रेडमार्क वापरणे गैर असून त्यामुळे व्यावसायिक हितसंबंधाला धोका संभवत असल्याचे ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सने म्हटले आहे. गर्ग वापरत असलेला ट्रेडमार्क ताज ग्रुपशी साधर्म्य आहे. त्यामुळे खटला दाखल करण्यात उशीर झाला म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.