आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय राजदुताला ठार मारण्यासाठी काबुल गेस्टहाऊसवर हल्ला, 4 भारतीयांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील गेस्टहाऊसमध्ये भारतीय राजदुत असल्याच्या संशयावरुन तालिबान दहशतवाद्यांनी काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास हल्ला केला होता. विदेशी नागरिकांमध्येही काबुल गेस्टहाऊस अत्यंत लोकप्रिय आहे. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी काही लोकांना ओलीस धरले होते. यावेळी उडालेल्या चकमकीत चार भारतीय आणि एका अमेरिकी नागरिकाचा मृत्यू झाला.
काबुलमधील पार्क पॅलेस गेस्टहाऊसवर काल रात्रीच्या सुमारास काही तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. याची माहिती मिळाल्यावर स्पेशल फोर्सेससह अफगाण नॅशनल सेक्युरिटी फोर्सेस घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत ओलिसांना सोडविण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू झाल्याचे अफगाणीस्तानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. यावेळी सहा नागरिक जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे. एका अमेरिकी नागरिकाचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
अफगाणिस्तानमधील भारतीय राजदुत अमर सिन्हा गेस्टहाऊसमध्ये असल्याचा संशय दहशतवाद्यांना होता. हा राजकीय हल्ला होता, असेही सांगितले जात आहे. पण याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, काबुल गेस्टहाऊसवर झालेल्या हल्ल्याची इतर छायाचित्रे....