आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Can Target Narendra Modi Afghanistan Indian Mujahideen

तालिबान्यांच्या निशाण्यावर मोदी? दहशतवादी अफगाणिस्तानात घेत आहेत ट्रेनिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तालिबानी निशाणा बनवू शकतात. मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी या गोष्टीची शक्यता वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान या कामासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत आहे. हेरातमध्ये भारतीय दुतावासवर हल्ला करण्यामागे भारतीय राजदूतांना बंधक बनवण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. परंतु सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांचा हा हेतू साध्य होऊ दिला नाही.

तालिबानी मोदींना निशाणा बनवू शकतात यामागचे कारण असे आहे, की काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार तालिबान भारतामधून आलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांना ट्रेनिग देत आहे. या माहितीवरून असा अंदाज वर्तवण्यात येत आहे, की तालिबानकडून ट्रेनिंग घेतलेले इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी भारतामध्ये येउन मोदींना निशाणा बनवू शकतात. मागील वर्षी पाटणा येथे नरेंद्र मोदींच्या सभेत इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी मोदी आमच्या निशाण्यावर असल्याचा खुलासा केला आहे.

सुरक्षा यंत्रणेशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे, की अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा इंडियन मुजाहिद्दीनसाठी एका नवीन ठीकाण्याच्या स्वरुपात पुढे आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बाटला हाऊस एन्काउंटर प्रकरणानंतर इंडियन मुजाहिद्दीनचे आझमगढ मॉड्यूलचे सदस्य शाहनवाज आणि साजिद बादा फरार झाले होते आणि सध्या ते अफगाणिस्तानमध्ये आहेत.