आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुप्रसिद्ध तंदूर कांडातील शर्माची फाशी रद्द; मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 18 वर्षांपूर्वी पत्नी नैना साहनीचा खून करून तंदूरमध्ये तिला जाळणा-या सुशील शर्माला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी काहीसा दिलासा दिला. न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली आहे. योग्य प्रक्रियेनंतर शिक्षा आणखी कमी होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले.


याआधी सत्र व उच्च न्यायालयाने सुशील शर्माचा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचे सांगत फाशीची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यास असहमती दर्शविली. 1995 मध्ये घडलेल्या घटनेवेळी सुशील शर्मा दिल्ली युवक कॉँग्रेसचा अध्यक्ष होता. सरन्यायाधीश पी. सदाशिवम, न्या. रंजना प्रकाश देसाई व न्या. रंजन गोगोई यांच्या पीठाने मंगळवारी शिक्षा कमी करण्याचा निकाल दिला. 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले. यानंतर पाच वर्षांनी हा निकाल आला. केवळ परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नसल्याचे शर्माने आपल्या अर्जात म्हटले होते.


23 जुलै 1995 च्या रात्रीची कथा
पत्नी नैना साहनीचे मतलूब करीम नावाच्या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सुशील शर्माला होता. 2 जुलै 1995 रोजी तो घरी परतला, तेव्हा नैना कोणाशी तरी फोनवर बोलत होती. तो येताच तिने फोन बंद केला. सुशीलने फोन रिडायल केल्यानंतर फोन मतलूब करीमने उचलला. रागाच्या भरात त्याने रिव्हॉल्वरने तिच्यावर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर तिचा मृतदेह जनपथावरील रेस्तराँमध्ये आणण्यात आले. त्याने व्यवस्थापक केशव कुमारसोबत नैनाच्या मृतदेहाचे तुकडे केले व तंदूरमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. तेथून जात असलेल्या कॉन्स्टेबल अब्दुल नजीरला संशय आल्याने गुन्हा उघडकीस आला.