आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये ट्रेन्ड करतोय #ChakDeIndia, भारताने पाकच्या भूमीत असे केले 'सर्जिकल स्ट्राइक'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्राना बुधवारी लक्ष्य केले. या कारवाईला लष्कराने 'सर्जिकल स्ट्राइक' म्हटले आहे. भारतीय जवानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे 7 तळ उद्धवस्त केले आहे. या कारवाईत 38 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे बोलले जात आहे.

लष्कराच्या या कारवाईने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. उल्लेेखनिय म्हणजे पाकिस्तानात ट्‍विटरवर #ChakDeIndia ट्रेेन्ड करत आहे.

स्ट्राइक म्हणजे काय? असा प्रश्न सर्वच भारतीयांच्या मनात उपस्थित झाला आहे. ही एक लष्करी कारवाई असून ते अतिशय नेमकेपणाने केली जाते.

एखादा निष्णात सर्जन एखाद्या रुग्णाच्या शरीरावरील नेमक्या ठिकाणाची शस्त्रक्रिया करतो. अगदी त्याचप्रमाणे लष्कराद्वारे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी परिणामकारण आणि अचूक शस्त्र कारवाई केली जाते. मोठे नुकसान होणार नाही, याची सर्जिकल स्ट्राइकमध्ये काळजी घेण्यात येते. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक होय.

पुढील स्लाइडवर क्लिक करून इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या, एक छोटीशी चूक बिघडवू शकते संपूर्ण खेळ...शत्रूच्या भूमीत घुसून असे केले जाते 'सर्जिकल स्ट्राइक'
बातम्या आणखी आहेत...