आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्य कथन करणारी ही आहे राधे माँची भक्त, मुंबई हल्ल्याची केली होती भविष्यवाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉलिवूड स्टार्सचे भविष्य सांगणारी प्रसिद्ध टॅरो कार्ड रिडर आरती राजदानही वादग्रस्त राधे माँची भक्त आहे. आरतीने मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याची भविष्यवाणी एका टीव्ही चॅनलवर तीन महिने आधी केली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार एवढेच तिने सांगितले नव्हते तर, दहशतवादी समुद्रमार्गे येणार असल्याचेही भविष्य आरतीने वर्तवले होते.

राधे माँवर रोज नवनवे आरोप लागत असताना टॅरो कार्डद्वारे भविष्यकथन करणाऱ्या आरतीने तिच्यावरील सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. आरती गेल्या 8 वर्षांपासून राधे माँच्या 'माता की चौकी'मध्ये हजेरी लावते. तिचे म्हणणे आहे, की चौकीत कधीही पैशांची मागणी होत नाही. तिने सांगितले, की मागील आठवड्यातच मी राधे माँ सोबत होते. आरती राधे माँ सोबत दिल्लीहून मुंबईला गेली होती.
निर्माता आणि दिग्दर्शक करन राजदानची पत्नी असलेली आरती मुळची पंजाबमधील अमृतसर येथील आहे. राजस्थानमधील माऊंट आबू येथे तिचे शिक्षण झाले. त्यानंतर मुंबईत मानसशास्त्रातून पदवी घेतली. आरती 10 वर्षे ओशोला शरण गेली होती. मुंबई हल्ल्यासह आरतीने नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील याची भविष्यवाणी 2011 मध्येच केली होती. त्याच बरोबर भारत वर्ल्डकप जिंकणार असल्याचीही भविष्यवाणी केली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आरती राजदानची आणखी छायाचित्रे