आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तस्लीमा-तरार यांच्यात TWITTER वॉर, माझी हत्या करु शकते मेहर, नसरीनचे ट्विट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बांगलादेशी वादग्रस्त लेखिका तस्लीमा नसरीन आणि सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेली पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांची सोशल साइटवर जोरदार जुंपली आहे. दोघींनी एकमेकींना ट्विटरवर शिव्यांची लाखोली वाहिली आहे. बुधवारी दिवसभर दोघीही एकमेकींविरोधात एकानंतर एक ट्विट करत होत्या. या वादाची सुरुवात तस्लीमा नसरीन यांनी बांगलादेश युद्धा दरम्यान पाकिस्तानी फौजांनी आत्मसमर्पण केल्याचा एक जूना व्हिडिओ शेअर केल्यावरुन झाली. वादग्रस्त लेखिका तस्लिमा यांनी एका ट्विट मध्ये म्हटले आहे, 'मेहर तरारने सुनंदा पुष्करला ट्विटरवर शिवीगाळ केली होती, त्यानंतर तिची हत्या झाली. आज तरारने मला शिव्या दिल्या आहेत, उद्या माझीही हत्या होऊ शकते. मला पोलिस संरक्षणाची गरज आहे.' त्यानंतर तरारने प्रत्युत्तर देण्यासाठी पुढील ट्विट केले,'लोल! हीच विचारवंत आणि उदारमतवादी नसरीन आहे का? मी तिच्या ट्विटला तेव्हा विरोध केला, जेव्हा तिने माझ्याबद्दल प्रश्न उपस्थित केले.'
दरम्यान दिल्ली पोलिस सुनंदा पुष्कर यांच्या गुढ मृत्यूप्रकरणात पत्रकार मेहर तरार यांच्या चौकशीची योजना आखत आहे. त्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तांशी संपर्क साधण्यात आला आहे.
एका व्हिडिओमुळे पेटला दोघींमध्ये वाद
तस्लीमा नसरीन यांनी ट्विटरवर एक जुना व्हिडिओ शेअर केला. त्यासोबतच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते, की बांगलादेश युद्धा दरम्यान पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर समर्पण केले होते. या पोस्टवर आक्षेप घेत पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आणि दोघींमध्ये बुधवारी दिवसभर शिवीगाळ सुरु झाली. एका ट्विटमध्ये नसरीन म्हणाल्या, 'मी पाकिस्तानबद्दल एक पोस्ट काय टाकली, मेहर तरार गरळ ओकू लागली.'
तरार म्हणाली, कोण आहे तस्लीमा?
पाकिस्तानी सैन्याबद्दल पोस्ट टाकल्याने संतप्त झालेल्या मेहर तरारने तिच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले, तस्लीमा नसरीन स्वतःला कोण समजते? त्यानतंरच्या ट्विटमध्ये तरारने तस्लीमा नसरीनचे काही पूर्वीचे ट्विट शेअर केले ज्यात तिने काही युजर्सला रिप्लाय केले होते.
फोटो - डावीकडून बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन आणि उजवीकडे मेहर तरार.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बांगलादशी लेखिका आणि पाकिस्तानी पत्रकार यांचे ट्विट वॉर